क्रीडा

बीसीसीआयच्या निवडणूक प्रकियेला वेग; १८ ऑक्टोबरला निवडणूक घेणार

वृत्तसंस्था

अध्यक्ष आणि उपाध्यक्षांसह सर्व पदांसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) १८ ऑक्टोबर रोजी निवडणूक घेणार आहे. निवडणुकीसोबतच वार्षिक सर्वसाधारण सभेचेही आयोजन करण्यात आले आहे. बीसीसीआयच्या निवडणूकपूर्व प्र्रक्रियेला वेग आल्याचे सूत्रांनी सांगितले.

सध्या बीसीसीआयचे अध्यक्ष असलेले सौरव गांगुली आणि सचिव जय शहा या दोघांचाही कार्यकाळ पूर्ण होत आहे. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. गांगुली आणि शाह यांना आणखी एका कार्यकाळासाठी निवडणूक लढविण्याची मुभा मिळाली आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून ‘कुलिंग ऑफ पिरियड’ या नियमात सूट देण्यात आल्यानंतर आता बीसीसीआयच्या निवडणूक प्रकियेला वेग आला आहे. निवडणूकपूर्व सर्व प्रकियांना सुरुवात झाली आहे. बीसीसीआयकडून निवडणूक अधिकारी म्हणून ए. के. ज्योती यांची निवड करण्यात आली आहे. प्रत्येक संलग्न संघटनांना आपल्या प्रतिनिधीचे नाव देण्यास ४ ऑक्टोबरपर्यंतचा अवधी देण्यात आला आहे.

बीसीसीआयच्या निवडणुकीसंदर्भात ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईत १८ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी मंडळाने २४ सप्टेंबरपासून अर्ज मागविले आहेत.

४ ऑक्टोबरपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे. त्यानंतर ११ आणि १२ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत. नामनिर्देशन अर्जांची छाननी १३ ऑक्टोबर रोजी होईल. वैध नामांकनांची यादी १३ ऑक्टोबर रोजीच प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर १८ ऑक्टोबर रोजी निवडणूक झाल्यानंतर त्याच दिवशी निकालही जाहीर होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार नियम बदलले आहेत. १८ ऑक्‍टोबर रोजी निवडणुकीसोबतच होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सेभत आयसीसीशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.

"तर पवारांची औलाद सांगायचो नाही..." उदयनराजेंच्या प्रचारसभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले?

पश्चिम महाराष्ट्रात कोणाचा गुलाल? मतदारांमध्ये उत्सुकता, मुद्यांवरून गुद्यांवर चर्चा

"अपना टाईम भी आयेगा" म्हणत बिचुकलेंनी सांगितले कल्याण मतदारसंघ निवडण्याचे कारण

Youtuber Elvish Yadav: एल्विश यादवला आणखीन एक झटका, मनी लॉन्ड्रिंगचा खटला दाखल, ED करणार चौकशी!

दोन्ही हात नसतानाही मिळवलं ड्रायव्हिंग लायसन्स, तमिळनाडूच्या तरूणानं कशी साधली किमया?