AP
क्रीडा

Paris Olympics 2024: श्रीजाचे वाढदिवशी विजयी सेलिब्रेशन; अनुभवी मनिका उपउपांत्यपूर्व फेरीत गारद

Sreeja Akula, Manika Batra: टेबल टेनिसमध्ये महिला एकेरीत भारताच्या श्रीजा अकुलाने उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. मात्र मनिका बत्राला उपउपांत्यपूर्व फेरीतच पराभवाला सामोरे जावे लागले.

Swapnil S

पॅरिस : टेबल टेनिसमध्ये महिला एकेरीत भारताच्या श्रीजा अकुलाने उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. मात्र मनिका बत्राला उपउपांत्यपूर्व फेरीतच पराभवाला सामोरे जावे लागले.

२६ वर्षीय श्रीजाने वाढदिवशीच महिला एकेरीच्या राऊंड ऑफ ३२ सामन्यात सिंगापूरच्या जियान झेंगला ४-२ असे नमवले. सहा गेमपर्यंत रंगलेली ही लढत श्रीजाने ९-११, १२-१०, ११-४, ११-५, १०-१२, १२-१० अशी जिंकली. मनिकानंतर भारतासाठी उपउपांत्यपूर्व फेरी गाठणारी श्रीजा ही दुसरीच खेळाडू ठरली आहे. आता तिच्यासमोर राऊंड ऑफ १६ सामन्यात चीनच्या सून यिंगशाचे आव्हान असेल. मनिकाचा पराभव झाल्याने श्रीजाला इतिहास रचण्याची संधी आहे. तिच्यावरच भारताचे एकेरीतील आव्हान टिकून आहे. श्रीजाने बुधवारी ती भारतातील आघाडीची टेबल टेनिसपटू का आहे, हे दाखवून दिले.

मनिकाला राऊंड ऑफ १६ लढतीत जपानच्या मियू हिरानोने ४-१ असे नेस्तनाबूत केले. हिरानोने मनिकावर ११-६, ११-९, १२-१४, ११-८, ११-६ असे सहज वर्चस्व गाजवले. पुरुषांमध्ये अचंता शरथ कमल, हरमीत देसाई यांचेही आव्हान आधीच संपुष्टात आले आहे. त्यामुळे आता सांघिक प्रकारात भारताला दोन्ही संघांकडून पदक अपेक्षित असेल.

IND vs NZ 5th ODI: भारताच्या फलंदाजांचा कस; न्यूझीलंडविरुद्ध आज निर्णायक पाचवा एकदिवसीय सामना

१४ कोटी मतदार अवैध, मग निवडणुका कशा वैध? राहुल गांधी यांचा सवाल

नवा शैक्षणिक वादंग; खासगी विद्यापीठे, स्वायत्त महाविद्यालये शुल्क नियामक प्राधिकरणाच्या कक्षेत? विरोधकांचा आक्षेप, सत्ताधारीही अस्वस्थ

Ind vs Pak U19 Final: आशियावर भारताचेच वर्चस्व; थरारक लढतीत पाकिस्तानवर १ गडी राखून सरशी, मोहित ठरला नायक

आजचे राशिभविष्य, १५ नोव्हेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत