PM
क्रीडा

सुदर्शन, राहुल यांची अर्धशतके

Swapnil S

केबेर्हा : आघाडीची फळी ढेपाळल्यानंतर युवा सलामीवीर साई सुदर्शनने (८३ चेंडूंत ६२ धावा) झळकावलेल्या सलग दुसऱ्या अर्धशतकाला कर्णधार के. एल. राहुलने (६४ चेंडूंत ५६ धावा) सुयोग्य साथ दिली. त्यामुळे भारताने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेपुढे विजयासाठी २१२ धावांचे लक्ष्य ठेवले. आफ्रिकेकडून वेगवान गोलंदाज नांद्रे बर्गरने ३० धावांत ३, तर ब्युरन हेंड्रिक्सने ३४ धावांत २ बळी मिळवले.

नाणेफेक जिंकून आफ्रिकेचा कर्णधार एडीन मार्करमने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. बर्गरने ऋतुराज गायकवाड (४), तिलक वर्मा (१०) यांना स्वस्तात माघारी पाठवून हा निर्णय योग्य ठरवला. मात्र सुदर्शन व राहुल यांनी तिसऱ्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी रचून संघाला सावरले. लिझाड विल्यम्सने सुदर्शनचा अडथळा दूर केला. सुदर्शनने ७ चौकार व १ षटकारासह ६२ धावा केल्या. तसेच कारकीर्दीतील पहिल्या दोन सामन्यात अर्धशतके झळकावणारा तो दुसरा भारतीय फलंदाज ठरला.

दुसऱ्या बाजूने संजू सॅमसन (१२), पदार्पणवीर रिंकू सिंग (१७) छाप पाडू न शकल्याने राहुलवर दडपण वाढले व तो बर्गरचा शिकार ठरला. राहुलने ७ चौकारांसह कारकीर्दीतील १८वे अर्धशतक साकारले. केशव महाराजने मग तळाच्या फलंदाजांना गुंडाळून भारताचा डाव ४६.२ षटकांत २११ धावांत संपुष्टात आणला.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त