क्रीडा

सूर्यकुमार आणि बाबर आझम यांच्यामध्ये टी-२० क्रमवारीत अव्वल स्थानासाठी जबरदस्त चुरस रंगणार

वृत्तसंस्था

आशिया चषक स्पर्धेत भारताचा सूर्यकुमार आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यांच्यामध्ये टी-२० क्रमवारीत अव्वल स्थान पटकाविण्यासाठी जबरदस्त चुरस रंगणार आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या क्रमवारीत क्रमवारीत भारताच्या सूर्यकुमार यादवने दुसरे स्थान कायम राखले आहे. यापूर्वीही तो दुसऱ्या स्थानावर होता; पण त्याला पहिल्या स्थानावर जाता आले नाही. पहिल्या स्थानावर भारताचा बाबर आझम आहे.

आझम हा ट्वेन्टी-२० क्रमवारीत पहिल्या स्थानावर असेलला फलंदाज आहे तर ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड आणि अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी अनुक्रमे गोलंदाज आणि अष्टपैलूंच्या यादीत अव्वल स्थानावर आहेत.

आशिया चषक स्पर्धेसाठी श्रेयस अय्यरला भारतीय संघात स्थान देण्यात आलेले नसले, तरी आयसीसीने टी-२० क्रमवारीत त्याने प्रगती केल्याचे दिसून येत आहे. श्रेयसने दोन स्थानांची क्रमवारीत झेप घेतली असून आणि त्याने १९वे स्थान पटकाविले आहे.

श्रेयसला खेळण्याची संधी मिळत नव्हती. विराट कोहली संघात नसल्यामुळे त्याला खेळण्याची संधी मिळाली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत त्याने अर्धशतकही झळकाविले होते. त्यामुळेच क्रमवारीत त्याची प्रगती झाल्याचे दिसत आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध नुकत्याच झालेल्या मालिकेतील शेवटच्या ट्वेन्टी-२० सामन्यात ४० चेंडूत ६४ धावांची खेळी केली होती.

गोलंदाजांमध्ये रवी बिश्नोई आणि कुलदीप यादव या फिरकीपटूंनी क्रमवारीत मोठी प्रगती केली. २१ वर्षीय बिश्नोईने वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेतील दोन सामन्यांत सहा विकेट्स घेत ५० व्या स्थानावरून ४४व्या स्थानावर उडी मारली. अंतिम सामन्यात कुलदीपने तीन विकेट घेतल्याने तो ५८ स्थानावरून ८७ व्या स्थानावर आला.

"तर पवारांची औलाद सांगायचो नाही..." उदयनराजेंच्या प्रचारसभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले?

पश्चिम महाराष्ट्रात कोणाचा गुलाल? मतदारांमध्ये उत्सुकता, मुद्यांवरून गुद्यांवर चर्चा

"अपना टाईम भी आयेगा" म्हणत बिचुकलेंनी सांगितले कल्याण मतदारसंघ निवडण्याचे कारण

Youtuber Elvish Yadav: एल्विश यादवला आणखीन एक झटका, मनी लॉन्ड्रिंगचा खटला दाखल, ED करणार चौकशी!

दोन्ही हात नसतानाही मिळवलं ड्रायव्हिंग लायसन्स, तमिळनाडूच्या तरूणानं कशी साधली किमया?