क्रीडा

वन-डे मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर शिखर धवनकडे कर्णधार पदाचे नेतृत्व

वृत्तसंस्था, प्रतिनिधी

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) टीम इंडिया जाहीर केली असून नेतृत्व शिखर धवनकडे सोपविण्यात आले आहे. उपकर्णधारपदाची धुरा श्रेयस अय्यरवर सोपविण्यात आली आहे. संघात रजत पाटीदार, शाहबाज अहमद, मुकेश कुमार, मोहम्मद सिराज यांचा समावेश करण्यात आला आहे. रजत पाटीदार आणि मुकेश कुमार यांना आंतरराष्ट्रीय वन-डे पदार्पण करण्याची नामी संधी उपलब्ध झाली आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेनंतर तीन वन-डे सामन्यांची मालिका होणार आहे. ही मालिका गुरुवारी ६ ऑक्टोबरपासून लखनौ येथील सामन्याने सुरू होणार आहे. रविवार, ९ ऑक्टोबर राजी रांची येथे दुसरा सामना खेळवला जाईल. मंगळवार, ११ ऑक्टोबर रोजी तिसरा आणि शेवटचा सामना दिल्लीत होईल.

अजब पालिकेचा गजब कारभार! CSMT स्थानकाजवळील भुयारी मार्गाची दुरुस्ती; नव्या लाद्या काढून पुन्हा नवीनच लाद्या बसवण्याचे काम

शिवसेना खरी कोणाची यावरील दक्षिण मुंबईचा कौल निर्णायक!

गिलचे अतिकौतुक महागात पडेल; श्रीकांत यांची टीका, ऋतुराजला राखीव खेळाडूंतूनही वगळल्यामुळे नाराजी

डबेवाला कामगार पुतळा हटवण्याच्या हालचाली : १ मे रोजी पुतळा झाकून ठेवल्याने अभिवादन करता आले नाही; डबेवाल्यांनी व्यक्त केली खंत

...अन्यथा चर्चगेट स्थानक जप्त करू; पश्चिम रेल्वे प्रशासनाला हायकोर्टाचा दणका