ANI
क्रीडा

Paralympic Games Paris 2024: पॅरिस पॅरालिम्पिकसाठी पथक रवाना; नांदेडची भाग्यश्री भारताची ध्वजवाहक

पॅरिस पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी भारताचे पथक रवाना झाले असून या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात नांदेडची भाग्यश्री जाधव भारताच्या ध्वजवाहकाची भूमिका बजावणार आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : पॅरिस पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी भारताचे पथक रवाना झाले असून या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात नांदेडची भाग्यश्री जाधव भारताच्या ध्वजवाहकाची भूमिका बजावणार आहे. भालाफेकपटू सुमित अंटीलही गोळाफेकपटू भाग्यश्रीच्या साथीने ध्वजवाहकाची धुरा वाहेल.

२८ ऑगस्टपासून पॅरिस पॅरालिम्पिक सुरू होणार असून यामध्ये भारताचे ८४ खेळाडू १२ क्रीडा प्रकारांत सहभागी होतील. २०२०च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने १९ पदके जिंकली होती. यावेळी भारताचे २५ पदकांचे लक्ष्य आहे. केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मंडविया यांच्या उपस्थितीत सर्व खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या. बॅडमिंटनपटू प्रमोद भगत मात्र या स्पर्धेला मुकणार असल्याने भारताला मोठा धक्का बसला आहे.

झुरळांचे आज 'चलो शिवाजी पार्क'; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJP चे देशव्यापी आंदोलन; शहांनी केलेली चूक फडणवीसांनी टाळावी - दीपके

जीएसटी २ लाख कोटी; सप्टेंबरमध्ये अप्रत्यक्ष कर संकलन १५ टक्क्यांनी वाढले

उल्हासनगरमधील व्यापाऱ्यांचा आज ‘नो यूपीआय डे’; डिजिटल पेमेंटला एक दिवसाचा ‘ब्रेक’; स्कॅनरवर काळे कापड टाकून निषेध

गस्तीवरच्या 'पोलीस दीदी'ने थप्पड लगावल्याचा राग, तरुणाने वर्दीवर उचलला हात; पोलिसांनी आवळल्या मुसक्या, VIDEO

दिवाळीत म्हाडा कोकणची सोडत शक्य; २,५०० घरांचा समावेश