क्रीडा

अल्टिमेट खो-खो लीगची निवड प्रक्रिया झाली पूर्ण; महाराष्ट्राच्या ४७ खेळाडूंचा समावेश

भारतीय खो-खो महासंघाच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या स्पर्धेतील सर्व सामन्यांचे सोनी क्रीडा वाहिनीवर थेट प्रक्षेपण करण्यात येणार

वृत्तसंस्था

भारताच्या पहिल्यावहिल्या अल्टिमेट खो-खो लीगची निवड प्रक्रिया पूर्ण झालेली असून एकंदर १४३ खेळाडूंना सहा संघांत विभागण्यात आलेले आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या (रेल्वे, कोल्हापूर, विदर्भासह) ४७ खेळाडूंचा समावेश असून आता १४ ऑगस्टपासून बालेवाडी, पुणे येथे अल्टिमेट खो-खो लीगचा थरार रंगणार आहे.

डाबर इंडिया आणि भारतीय खो-खो महासंघाच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या स्पर्धेतील सर्व सामन्यांचे सोनी क्रीडा वाहिनीवर थेट प्रक्षेपण करण्यात येणार असून सायंकाळी ७ वाजता सामन्यांना प्रारंभ होणार आहे. २८ राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशातील २४० खेळाडूंनी अ, ब, क, ड, अशा चार गटांत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील कामगिरीच्या आधारावर विभागण्यात आले होते. त्यापैकी १४३ खेळाडूंना संघमालकांची पसंती लाभली आहे. चेन्नई क्विक गन्स, मुंबई खिलाडीज, तेलुगू योद्धा, गुजरात जायंट्स, राजस्थान वॉरियर्स, ओडिशा जगरनॉट्स हे सहा संघ या स्पर्धेच्या पहिल्या हंगामात सहभागी होणार आहेत. २१ दिवसांत एकूण ३४ सामने खेळले जाणार असून इंग्रजी, हिंदी आणि तेलुगू भाषेतील समालोचनासह सामन्यांचा आस्वाद चाहत्यांना लुटता येणार आहे.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

ठाकरेंचे वलय संपले का?