सबालेंका सलग चौथ्यांदा, तर रायबॅकिना प्रथमच अंतिम फेरीत US Open/Instagram
क्रीडा

सबालेंका सलग चौथ्यांदा, तर रायबॅकिना प्रथमच अंतिम फेरीत; अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत कोको गॉफ, पेगुला उपांत्य लढतीत पराभूत

बेलारूसची अग्रमानांकित तसेच गतविजेती आर्यना सबालेंकाने शुक्रवारी सलग चौथ्यांदा अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. तिच्यासमोर आता रविवारी होणाऱ्या महाअंतिम मुकाबल्यात कझाकस्तानच्या दुसऱ्या मानांकित एलिना रायबॅकिनाचे आव्हान असेल.

Swapnil S

न्यूयॉर्क : बेलारूसची अग्रमानांकित तसेच गतविजेती आर्यना सबालेंकाने शुक्रवारी सलग चौथ्यांदा अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. तिच्यासमोर आता रविवारी होणाऱ्या महाअंतिम मुकाबल्यात कझाकस्तानच्या दुसऱ्या मानांकित एलिना रायबॅकिनाचे आव्हान असेल.

रायबॅकिनाने कारकीर्दीत प्रथमच या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. अमेरिकेची तिसरी मानांकित जेसिका पेगुला आणि चौथी मानांकित कोको गॉफ यांचे आव्हान मात्र उपांत्य फेरीतील पराभवामुळे संपुष्टात आले.

अमेरिकन ओपन या वर्षातील चौथ्या व अखेरच्या ग्रँडस्लॅम स्पर्धेचा थरार गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू आहे. यंदा या स्पर्धेचे १४६वे वर्ष सुरू आहे. पुरुष एकेरीत जर्मनीच्या अग्रमानांकित अलेक्झांडर झ्वेरेव्हला जेतेपदासाठी दावेदार मानले जात आहे. शनिवारी होणाऱ्या उपांत्य लढतीत झ्वेरेव्हची कॅरेन खाचानोव्हशी गाठ पडेल. दुसऱ्या उपांत्य लढतीत बेन शेल्टन व फ्रान्सेस टियाफो हे अमेरिकन खेळाडू आमनेसामने येतील.

दरम्यान, पहिल्या उपांत्य लढतीत पिछाडीनंतर जोरदार मुसंडी मारत रायबॅकिनाने गॉफचा ३-६, ६-४, ६-४ असा पराभव केला. दुसऱ्या उपांत्य लढतीत २०२४ व २०२५च्या विजेत्या सबालेंकाने पेगुलावर ७-५, ६-२ अशी सरळ दोन सेटमध्ये मात केली. आता सेरेना विल्यम्सननंतर (२०१२ ते २०२४) सलग तीन वेळा अमेरिकन ओपन जिंकणारी महिला टेनिसपटू ठरण्याची सबालेंकाला संधी आहे.

हे माहीत आहे का?

वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत रायबॅकिनाने सबालेंकाला नमवले होते. त्यावेळीदेखील सबालेंका सलग चौथ्यांदा अंतिम फेरीत पोहोचली होती व तिला तिसऱ्यांदा जेतेपदाची संधी होती.

आता अमेरिकन ओपनच्या अंतिम फेरीतही सबालेंका सलग चौथ्यांदा दाखल झाली असून २०२४ व २०२५नंतर तिसऱ्यांदा तिला जेतेपदाची संधी आहे. त्यामुळे ती रायबॅकिनाचा वचपा घेणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Maratha Reservation : उत्सवात विघ्न नाही; मनोज जरांगेंचा निर्वाळा, अंतरवाली सराटीत आज बैठक, मुंबई आंदोलनाचा कार्यक्रम ठरणार

Mumbai Rain : आजपासून पुन्हा पाऊस; मुंबईत यलो अलर्ट

BRICS Summit 2026 : आजपासून दिल्लीत ब्रिक्स शिखर परिषद

Navi Mumbai : सचिवांच्या तोंडाला काळे; MPSC च्या विरोधात संभाजी ब्रिगेडचे आंदोलन

लंडनमध्ये विश्व मराठी साहित्य संमेलन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांची घोषणा