क्रीडा

वैभव सूर्यवंशी मोडणार सचिन तेंडुलकरचा विक्रम

बीसीसीआयने १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीला भारतीय संघात स्थान देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याने २०११ मध्ये जेव्हा एकदिवसीय विश्वचषक जिंकला आणि २०१३ मध्ये वानखेडे स्टेडियमवर क्रिकेटला अलविदा केला, तेव्हा वैभव अवघा काही वर्षांचा होता. आता तोच वैभव सचिन तेंडुलकरचा सर्वात तरुण खेळाडू म्हणून आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याचा विक्रम मोडीत काढण्यासाठी सज्ज झाला आहे.

Swapnil S

मुंबई: आयपीएल २०२६ च्या हंगामात चमकदार कामगिरीद्वारे सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या वैभव सूर्यवंशीची भारतीय टी-२० संघात निवड झाली आहे. बीसीसीआयने या १५ वर्षीय खेळाडूला भारतीय संघात स्थान देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याने २०११ मध्ये जेव्हा एकदिवसीय विश्वचषक जिंकला आणि २०१३ मध्ये वानखेडे स्टेडियमवर क्रिकेटला अलविदा केला, तेव्हा वैभव अवघा काही वर्षांचा होता. आता तोच वैभव सचिन तेंडुलकरचा सर्वात तरुण खेळाडू म्हणून आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याचा विक्रम मोडीत काढण्यासाठी सज्ज झाला आहे.

भारतीय क्रिकेटच्या ९४ वर्षांच्या इतिहासात वैभव सूर्यवंशीची ही निवड अत्यंत दुर्मिळ मानली जात आहे. तो अवघा १५ वर्षांचा असला तरी संघ व्यवस्थापन त्याची पूर्ण काळजी घेत आहे. भारताच्या आगामी आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यावरील टी-२० मालिकेसाठी त्याची निवड झाली आहे. या १५ दिवसांच्या कालावधीत भारत युनायटेड किंगडममध्ये सात टी-२० सामने खेळणार असून वैभवला किमान एका सामन्यात खेळण्याची संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. याशिवाय या वर्षाच्या शेवटी जपानमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीही त्याची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. जेव्हा तो मैदानात उतरेल, तेव्हा तो भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा सर्वात तरुण खेळाडू ठरेल.

भारताने यापूर्वी १९८९ मध्ये सचिन तेंडुलकरच्या रूपाने अशीच एक अफाट प्रतिभा पाहिली होती, ज्याने पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांचा सामना करत जागतिक क्रिकेट गाजवले. आता वैभव सूर्यवंशीच्या रूपाने भारताला पुन्हा एकदा तशीच अफाट क्षमता असलेला खेळाडू मिळाला आहे.

वैभवने वयाच्या अवघ्या १४ वर्षे आणि २३ दिवस वय असताना मोहम्मद सिराज, इशांत शर्मा, रशीद खान आणि प्रसिध कृष्णा अशा बलाढ्य गोलंदाजांसमोर अवघ्या ३५ चेंडूंत आयपीएलमधील सर्वात वेगवान शतकांपैकी एक शतक ठोकले होते.

वैभव सूर्यवंशीचे पदार्पण १५ वर्षे ९१ दिवसांचा असताना होऊ शकते.

दिवाळीपर्यंत साखरेची ‘शंभरी’? ऐन सणासुदीत सर्वसामान्यांना दरवाढीचा फटका

Mumbai : रिक्षा बंदचा फटका! मराठी सक्तीबाबत अफवा, 'रास्ता रोको'; पश्चिम उपनगरांत प्रवाशांची गैरसोय

सट्टेबाजीमुळेच कांद्याची दरवाढ - केंद्राचा दावा; किरकोळ दरात ५९ टक्क्यांची वाढ, सरकारचा 'कांदा एक्स्प्रेस'चा धडाका

Mumbai : 'रुस्तमजी'मधील १२८ फ्लॅटधारकांवर कारवाई; मंत्री, माजी आमदारांच्या घरांतील अतिक्रमणावर पालिकेचा हातोडा

'कॉकरोच'चा ५ सप्टेंबरला दिल्लीत पुन्हा माेर्चा