एक्स @DosaSpeaks
क्रीडा

IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कष्टप्रद प्रवास; दहा वर्षांचा असताना दिवसाला ६०० चेंडूंचा सामना

आयपीएलमधील आपल्या पदार्पणाच्या पहिल्याच चेंडूवर शार्दुल ठाकूरला षटकार ठोकत १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने क्रीडा जगताचे लक्ष वेधून घेतले.

Swapnil S

नवी दिल्ली : आयपीएलमधील आपल्या पदार्पणाच्या पहिल्याच चेंडूवर शार्दुल ठाकूरला षटकार ठोकत १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने क्रीडा जगताचे लक्ष वेधून घेतले. अवघ्या दहा वर्षांचा असताना तो दिवसाला किमान ६०० चेंडूंचा सामना करायचा. त्याच्या या यशामागे वडिल संजीव सूर्यवंशी यांचाही मोलाचा वाटा आहे. तसेच पाटणा येथील प्रशिक्षक मनीष ओझा यांचेही त्याला मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

वैभव १० वर्षांचा असताना तो दररोज किमान ६०० चेंडूंचा सामना करायचा. त्यानंतर बिहार क्रिकेट असोसिएशनने वैभवला पाठबळ दिले. राजस्थान रॉयल्सचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी या हिऱ्याला पैलू पाडले. द्रविड यांनी त्याचा कसून सराव घेतला. तसेच त्याला १५० किमी प्रति तास वेगाने येणाऱ्या चेंडूवर फलंदाजीचे प्रशिक्षण दिले. या दरम्यान एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर आपण फलंदाजी करू शकतो असता आत्मविश्वास वैभवला आला.

आयपीएलमध्ये २० चेंडूंत ३४ धावा करणे हे सामान्य आहे. परंतु अवघ्या १४ वर्षांच्या खेळाडूकडून अशी कामगिरी होणे म्हणजे नक्कीच अवाक करणारे आहे.

शनिवारी लखनऊ विरुद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा पराभव झाला असला तरी वैभव सूर्यवंशीसाठी हा सामना बरेच काही बोलून गेला. आयपीएलमधील त्याचा हा पदार्पणाचा सामना होता. या सामन्यात सलामीला फलंदाजीला येत वैभवने २ चौकार आणि ३ षटकार लगावत २० चेंडूंत ३४ धावा चोपण्याची कामगिरी करत क्रीडा जगताचे लक्ष वेधून घेतले.

वयाच्या आठव्या वर्षी संजीव यांनी वैभवला माझ्याकडे आणले होते. इतर खेळाडूंच्या तुलनेत वैभवमध्ये आकलन क्षमता अधिक होती. स्टान्स, बॅक-लिफ्ट, लक्ष्य आणि त्यासाठी मेहनत करणे या गोष्टी वैभवला पुढे घेऊन गेल्या.

- मनीष ओझा, प्रशिक्षक

कल्याण-डोंबिवलीकरांना दिलासा; काळू धरण प्रकल्प लवकर पूर्ण होणार, एकनाथ शिंदेंचे आश्वासन

कारवाई तर होणारच! इंडिगोच्या कारभारावर मुरलीधर मोहोळ यांचा थेट इशारा

भाजप खासदाराच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळे थिरकल्या; कंगना रणौतचाही व्हिडीओ व्हायरल

स्मृती मानधना-पलाश मुच्छलचं लग्न मोडलं; दोघांचीही सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

Goa Nightclub Fire Update : आगीत २५ जणांचा दुर्दैवी अंत तर ६ जण जखमी, पंतप्रधान राष्ट्रीय निधीतून मदत जाहीर