Vinod Kambli struggling to walk video viral  canva
क्रीडा

Vinod Kambli : एकेकाळी मैदान गाजवणाऱ्या विनोद कांबळीची झाली अशी अवस्था; धड चालताही येत नाही! Video Viral

Pooja Pawar

मुंबई : एकेकाळी मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर सोबत मैदान गाजवणारा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याचा दयनीय अवस्थेतील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुंबईतील रस्त्यावरचा हा व्हिडीओ असून यात विनोद कांबळीला आधाराशिवाय चालताही येत नसल्याचं दिसतं आहे. त्यामुळे एकेकाळी क्रिकेटच्या मैदानात चौकार षटकारांची आतिषबाजी करणाऱ्या कांबळीची अशी अवस्था पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये विनोद कांबळी हा एका बुलेट बाईकला पकडून उभं राहण्याचा प्रयत्न करतोय. मात्र त्याला उभं राहण्यात अडचणी येत होत्या. सुरुवातीला त्याच्या मदतीसाठी कोणीही पुढे येत नव्हते मात्र थोड्यावेळाने जवळच्या दुकानात बसलेले काहीजण मदतीसाठी पुढे आले आणि त्याला धरून रस्त्याच्या कडेला आणले. काहीवेळाने लोकांना हा व्यक्ती माजी क्रिकेटर विनोद कांबळी आहे हे कळल्यावर अनेक जणांनी त्याच्या भोवती गर्दी केली.

विनोद कांबळीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. विनोदच्या चाहत्यांनी हा व्हिडीओ पाहून त्याच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली आहे. काही जणांनी व्हिडीओवर कमेंट करत "विनोद लवकर बरा हो" असं म्हंटलंय. तर काहींनी या अवस्थेला विनोद कांबळी हा स्वतःच जबाबदार असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तसेच काहींनी व्हिडीओ खाली कमेंट करत हा "खरोखरच विनोद कांबळी आहे का?" असा प्रश्न उपस्थित केला आहे.

विनोद कांबळी यापूर्वी सुद्धा याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला होता. त्याच्या पत्नीने काही वर्षांपूर्वी विनोदवर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते. तर काही महिन्यांपूर्वी विनोदने त्याच्याकडे काम नसून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी कोणीतरी आपल्याला नोकरीची संधी द्यावी असं एका मुलाखतीत म्हंटलं होत. माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीच्या प्रकृतीबद्दल बोलायचं झालं तर त्याला २०१३ रोजी गाडी चालवत असताना हार्ट अटॅक आला होता, त्यामुळे त्याची एनजियोप्लास्टी सुद्धा करण्यात आली होती.

विनोद कांबळीची कारकीर्द :

माजी क्रिकेट असलेल्या विनोद कांबळीने टीम इंडियाकडून १०० पेक्षा जास्त वनडे सामने खेळले आहेत. तर १७ टेस्ट सामन्यांमध्ये त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले होते. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये विनोद कांबळीच्या नावावर जवळपास १० हजारपेक्षा जास्त रन्स आहेत. यात त्याचा सर्वाधिक स्कोअर हा २६२ रन्स इतका होता. विनोद कांबळीने २२ सप्टेंबर २०११ रोजी फर्स्ट क्लास क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.

‘मेट्रो-३’ला नवा मुहूर्त! पहिला टप्पा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सेवेत? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार

मध्य रेल्वेत ज्येष्ठांसाठी मालडबा खुला करा; हायकोर्टाचे रेल्वे प्रशासनाला आदेश

मराठा आरक्षणाचा वाद; राज्य सरकारला ‘तो’ अधिकार नाही - हाके

ठाणे स्थानकात उद्या रात्री ६ तासांचा पॉवर ब्लॉक, रात्री १०.३० ते पहाटे ४.३० पर्यंत गर्डर बसविण्याचे काम

धुळ्यातील धक्कादायक घटना, एकाच कुटुंबातील चौघांनी संपवले आयुष्य