क्रीडा

विराट कोहली अडकला पॅरिसमध्ये उष्णतेच्या लाटेत

पॅरिसमध्ये उष्णतेची लाट सुरू असून तापमान ४१ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे.

वृत्तसंस्था

वेस्ट इंडिज दौऱ्यातून सुट्टी घेत पॅरिसला गेलेला भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली पॅरिसमध्ये उष्णतेच्या लाटेत अडकला आहे. कोहलीने स्वत:च सुट्टी मागितली होती. ही सुट्टी तो पत्नी आणि मुलीसह घालवत आहे. त्यासाठी तो सहकुटुंब पॅरिसलाही रवाना झाला; मात्र संकटांनी तिथेही त्याची पाठ सोडलेली नाही. सुट्टी मजेत घालविण्यासाठी पॅरिसला गेलेला कोहली तेथील उष्णतेच्या लाटेत अडकला आहे.

सध्या पॅरिसमध्ये हवामानात अनपेक्षित भीषण बदल झाला आहे. पॅरिसमध्ये उष्णतेची लाट सुरू असून तापमान ४१ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. त्यामुळे सुट्टी घालविण्यासाठी ही परिस्थिती आदर्श नसल्याचे सांगण्यात येत आहे. अनुष्काने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर हॉटेलमधील रूमचा एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये तिने पॅरिसमधील वाढलेल्या तापमानाची माहिती दिली आहे. सध्या सर्वच बाबतीत कोहलीच्या मागे संकटांचा ससेमिरा लागल्याचे दिसत आहे. गेल्या काही काळापासून कोहली मैदानावर कामगिरी करण्यात सातत्याने अपयशी ठरत आहे. त्यामुळे त्याच्यावर जोरदार टीकादेखील सुरू आहे. दरम्यान, भारतीय संघाच्या झिम्बाब्वे दौऱ्यावर विराट कोहलीने खेळावे, अशी बीसीसीआयची इच्छा असल्याचे वृत्त आहे. आशिया चषकासारख्या महत्त्वाच्या स्पर्धेपूर्वी कोहलीने या मालिकेत खेळावे, अशी बोर्डाची इच्छा आहे.

इनसाइड स्पोर्ट्सला बीसीसीआयच्या एका सूत्राने याबाबत माहिती दिली. येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आयसीसी टी-२० विश्वचषक होत आहे. त्यापूर्वी कोहलीने फॉर्ममध्ये येण्याची आवश्यकता आहे. क्रिकेट खेळूनच त्याचा फॉर्म परत येऊ शकतो. त्यामुळे त्याने झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत खेळावे, असे बीसीसीआय अधिकाऱ्यांना वाटत असल्याचे बोलले जात आहे.

राजकीय ‘सिच्युएशनशिप’च्या कात्रीत उबाठा

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा; विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच -अजित पवार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन