PM
क्रीडा

वॉर्नरचे टीकाकारांना दीडशतकाद्वारे प्रत्युत्तर

पर्थ येथे सुरू असलेल्या या कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर कांगारूंनी ८४ षटकांत ५ बाद ३४६ धावा केल्या असून मिचेल मार्श १५, तर अॅलेक्स कॅरी १४ धावांवर खेळत आहे.

Swapnil S

पर्थ : ऑस्ट्रेलियाचा अनुभवी सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने (२११ चेंडूंत १६४ धावा) गुरुवारी धडाकेबाज दीडशतकी खेळी साकारून टीकाकारांना तसेच त्याच्या संघातील स्थानावर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले. ३७ वर्षीय वॉर्नरने १६ चौकार व ४ षटकारांसह सजवलेल्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीत दमदार सुरुवात केली.

पर्थ येथे सुरू असलेल्या या कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर कांगारूंनी ८४ षटकांत ५ बाद ३४६ धावा केल्या असून मिचेल मार्श १५, तर अॅलेक्स कॅरी १४ धावांवर खेळत आहे. सलामीवीर उस्मान ख्वाजा (४१) व ट्रेव्हिस हेड (४०) यांना अर्धशतकाने हुलकावणी दिली. स्टीव्ह स्मिथ (३१), मार्नस लबूशेन (१६) यांना मात्र अपयश आले. वॉर्नरने वर्षातील पहिले शतक साकारले. तो कारकीर्दीतील अखेरची कसोटी मालिका खेळत असून सिडनी येथे होणारी तिसरी कसोटी त्याची शेवटची कसोटी असेल. वॉर्नरचे हे एकंदर कसोटी कारकीर्दीतील २६वे शतक ठरले. शतकानंतर वॉर्नरने नेहमीप्रमाणे हवेत झेपावत जल्लोष करताना समालोचन बॉक्समध्ये बसलेला मिचेल जॉन्सनकडे पाहून शांत राहण्याची खूणही केली.

मराठवाड्यात कोसळधार! ढगफुटी सदृश्य पावसाने गावांचा संपर्क तुटला, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान

नवीन GST सुधारणांमुळे ग्राहकांना दिलासा; आजपासून अन्न, गृहनिर्माण, इलेक्ट्रॉनिक्स, औषधे, वाहने, शेती, आरोग्यसेवा स्वस्त

आजपासून GST बचत उत्सव! पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा : स्वदेशी, स्वावलंबनावर भर; जनतेची २.५ लाख कोटींपेक्षा जास्त बचत होणार

दिल्ली विधानसभेला मोठ्या संख्येने मतचोरी; आता 'आप'चाही आयोगावर हल्लाबोल

मतदार यादी सखोल परीक्षणासाठी सज्ज व्हावे; केंद्रीय निवडणूक आयोगाचे निर्देश