क्रीडा

अश्विनविरुद्ध सक्रीय पवित्रा स्वीकारणार; स्टीव्ह स्मिथचे वक्तव्य

वर्ष २०२०-२१ मध्ये भारतीय फिरकीपटूंविरुद्ध फलंदाजी करताना झालेला संघर्ष टाळण्यासाठी आगामी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेत रविचंद्रन अश्विनविरुद्ध सक्रीय पवित्रा स्विकारणार असल्याचे ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथ म्हणाला. २०२०-२१ मध्ये अश्विनने स्मिथला तीन वेळा बाद केले. २०२३ मध्ये हा फलंदाज दोनदा अश्विनच्या गळाला लागला.

Swapnil S

मेलबर्न : वर्ष २०२०-२१ मध्ये भारतीय फिरकीपटूंविरुद्ध फलंदाजी करताना झालेला संघर्ष टाळण्यासाठी आगामी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेत रविचंद्रन अश्विनविरुद्ध सक्रीय पवित्रा स्विकारणार असल्याचे ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथ म्हणाला. २०२०-२१ मध्ये अश्विनने स्मिथला तीन वेळा बाद केले. २०२३ मध्ये हा फलंदाज दोनदा अश्विनच्या गळाला लागला.

ऑस्ट्रेलियातील प्रसारमाध्यमाशी बोलताना स्मिथ म्हणाला की, ऑफ स्पिनर विरुद्ध ऑस्ट्रेलियात बाद होणे मला आवडत नाही. परंतु अश्विन हा चांगला गोलंदाज आहे. ऑस्ट्रेलियात गोलंदाजी करण्यासाठी त्याने चांगली योजना आखली असेल. काही वेळा तो मला वरचढ राहिला आहे. पण त्यानंतर एससीजीवर मी त्याच्याविरुद्ध धावा जमवल्या. सिडनीमध्ये मी १३१ आणि ८१ धावा केल्या होत्या. हेच माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. त्याच्याविरुद्ध सक्रीय राहा. त्याला स्थिरावू देऊ नका. अन्यथा तो त्याला जे हवे ते आपल्या गोलंदाजीतून करू शकतो, असे स्मिथ म्हणाला.

स्मिथ आणि अश्विन यांच्यातील क्रिकेटचे युद्ध सर्वांनाच माहित आहे. या स्पर्धेनिमित्त ते पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे.

अश्विन आणि माझ्यात चांगल्या लढती झाल्यात

गेल्या काही वर्षांत अश्विन आणि माझ्यात काही चांगल्या लढती झाल्या आहेत. जेव्हा तुम्ही पाच सामने खेळत असता, त्यावेळी १० डाव खेळावे लागतात. जर एखाद्या खेळाडूने तुमच्यावर वर्चस्व गाजवले तर पुनरागमन करणे कठीण होऊ शकते. अशावेळी प्रत्येक गेममध्ये तुम्हाला त्या मानसिक आव्हानांचा सामना करावा लागतो. दोन सामन्यांच्या मालिकेप्रमाणे पाच सामन्यांमध्ये लपण्यासाठी नाही, असे स्मिथ म्हणाला.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी