क्रीडा

इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा, व्हिक्टर अॅक्सेलसन व ताई यिंग विजेतेपदी

अलेक्सनने सलग तिसऱ्यांदा आणि एकूण पाचव्यांदा झाओला पराभवाची धूळ चारली

वृत्तसंस्था

डेन्मार्कच्या अव्वल मानांकित व्हिक्टर अॅक्सेलसनने पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात चीनच्या झाओ जुन पेंगला २१-९, २१-१० अशा फरकाने पराभूत करून इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. यासह त्याने दुसऱ्यांदा या स्पर्धेत चॅम्पियन होण्याचा बहुमान पटकावला. अलेक्सनने सलग तिसऱ्यांदा आणि एकूण पाचव्यांदा झाओला पराभवाची धूळ चारली.

चीनच्या झाओ जुन पेंगला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्याने सर्वोत्तम खेळ करत विजयी मोहीम कायम ठेवत अंतिम फेरी गाठली होती. मात्र त्याला या सामन्यात आपली लय कायम ठेवण्यात अपयश आले.

महिलांमध्ये ताई यिंगला विजेतेपद

महिला एकेरीत चायनीज तैपेईच्या ताई झू यिंग हिने विजेतेपद पटकाविले. तिने चीनच्या वांग झी यी हिचा २१-२३, २१-६, २१-१५ ने पराभव करत अंतिम सामना जिंकला. पहिल्या गेममधून अपयशातून सावरत ताई यिंगने दमदार मुसंडी मारत सामना विजेतेपदाचा मान मिळविला.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत