ANI,@OfficialSLC/x
क्रीडा

आशिया चषकासाठी महिला संघ श्रीलंकेत दाखल

Swapnil S

कँडी : १९ जुलैपासून रंगणाऱ्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय महिला संघ बुधवारी श्रीलंकेत दाखल झाला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाची पहिल्याच लढतीत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी गाठ पडणार आहे.

भारताने सर्वाधिक ८ वेळा ही स्पर्धा जिंकली असून २०२२मध्ये झालेल्या गेल्या आशिया चषकातसुद्धा भारतानेच जेतेपद मिळवले होते. यंदा बांगलादेशमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या निमित्ताने आशिया चषकाचे महत्त्व वाढले आहे.

या स्पर्धेत ८ संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली असून भारताला अनुक्रमे पाकिस्तान, यूएई आणि नेपाळ या संघांशी दोन हात करायचे आहेत. भारताने नुकताच दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी-२० मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली. या मालिकेत खेळलेल्या १७ पैकी १५ खेळाडूंनाच आशिया चषकासाठी प्राधान्य देण्यात आले आहे. भारताचेच पारडे या स्पर्धेसाठी जड मानले जात आहे.

मविआचा तिढा सुटला! २६० जागांवर सहमती; २८ जागांवर रस्सीखेच; १-२ दिवसांत जागावाटप जाहीर होणार

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन