क्रीडा

भारतीय बॉक्सिंगला सावरण्यासाठी अखेर हंगामी समितीची स्थापना

भारतीय बॉक्सिंग महासंघाची (बीएफआय) विस्कटलेली घडी पुन्हा बसविण्यासाठी जागतिक बॉक्सिंगने पावले उचलली असून, ‘बीएफआय’चे दैनंदिन कामकाज आणि व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी जागतिक बॉक्सिंगकडून ‘बीएफआय’वर सहा सदस्यीय हंगामी समितीची नियुक्ती करण्यात आली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : भारतीय बॉक्सिंग महासंघाची (बीएफआय) विस्कटलेली घडी पुन्हा बसविण्यासाठी जागतिक बॉक्सिंगने पावले उचलली असून, ‘बीएफआय’चे दैनंदिन कामकाज आणि व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी जागतिक बॉक्सिंगकडून ‘बीएफआय’वर सहा सदस्यीय हंगामी समितीची नियुक्ती करण्यात आली आहे.

जागतिक बॉक्सिंगचे अध्यक्ष बोरिस व्हॅन डर व्होर्स्ट यांनी हा निर्णय घेतला असून, सहा सदस्यीय समितीची नियुक्ती केल्याची माहिती ‘बीएफआय’ अध्यक्ष अजय सिंग यांना एका मेलद्वारे कळवली आहे. ‘बीएफआय’चे अध्यक्ष अजय सिंग यांच्याकडेच अध्यक्षपद सोपविण्यात आले असून, या समितीचा कालावधी ९० दिवसांपेक्षा अधिक नसेल. समितीमध्ये ‘बीएफआय’चे उपाध्यक्ष नरेंद्र कुमार निर्वान, कार्यकारी संचालक अरुण मलिक, ऑलिम्पियन सरिता देवी यांचा समावेश असेल. अन्य दोन सदस्यांपैकी एक सदस्य हा भारतीय ऑलिम्पिक संघटनेचा (आयओए) नामांकित सदस्य असेल. त्याची निवड ‘आयओए’ अध्यक्षांशी चर्चा करून करण्यात येईल. ‘आयओए’ अध्यक्षा पी. टी. उषा यांनी अजून त्या सदस्याच्या नावाची घोषणा केलेली नाही. सिंगापूर बॉक्सिंगचे अध्यक्ष फेरुझ मोहम्मद हे देखील या समितीचे सहावे सदस्य असतील. ते समितीच्या कामकाजाचे मूल्यांकन करण्यासाठी जागतिक बॉक्सिंगचे प्रतिनिधी म्हणून काम पाहतील.

अलीकडच्या काळात ‘बीएफआय’च्या कामकाजाची घडी विस्कळीत झालेली दिसून येत आहे. गटबाजी, अंतर्गत संघर्षाचा संघटनेला फटका बसत आहे. फेब्रुवारी महिन्यात अपेक्षित असलेली निवडणूक काही ना काही कारणाने लांबत आहे. आता तर निवडणूक न्यायप्रविष्ट बनली आहे. निवडणुका होईपर्यंत भारतीय खेळाडूंचे नुकसान होऊ नये आणि ‘बीएफआय’चे कामकाज सुरू राहावे, यासाठी ही समिती स्थापन करण्यात आल्याचे होर्स्ट म्हणाले.

तरुण तेजपालला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; याचिका फेटाळली, दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

Mumbai : माझगावच्या गणपती मिरवणुकीवर अंडी फेकल्याचा आरोप; २२ वर्षीय तरुणाला अटक

Mumbai : बीकेसीतील 'एमसीए'च्या ५ उपाहारगृहांचे परवाने रद्द; FDA चा दणका; कारवाई सुरूच

Mumbai : चर्चगेट मेट्रो स्थानकातील लिफ्ट अचानक बंद; ६ प्रवासी अडकले

गर्लफ्रेंडने कारवर उमटवले ३४०० 'किस'; VIDEO व्हायरल होताच पोलिसांची कारवाई, तरुणाला ५,५०० रुपयांचा दंड