क्रीडा

भारताचे दोन्ही संघ बाद फेरीत; जागतिक सांघिक टेबल टेनिस स्पर्धा

भारताच्या दोन्ही संघांनी मंगळवारी साखळीत दमदार विजय नोंदवले. या स्पर्धेत दोन्ही गटांत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करणारे आठ संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी थेट पात्र ठरणार

Swapnil S

बुसान : भारताच्या पुरुष व महिला संघांनी जागतिक सांघिक टेबल टेनिस स्पर्धेची बाद फेरी (राऊंड ऑफ ३२) गाठली. भारताच्या दोन्ही संघांनी मंगळवारी साखळीत दमदार विजय नोंदवले. या स्पर्धेत दोन्ही गटांत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करणारे आठ संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी थेट पात्र ठरणार आहेत.

बुसान येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत भारतीय महिलांनी स्पेनला पिछाडीवरून ३-२ असे नमवले. श्रीजा अकुला व मनिका बत्रा यांना एकेरीच्या सामन्यांत पराभव पत्करावा लागल्याने भारतीय संघ ०-२ असा पिछाडीवर होता. मात्र त्यानंतर अहिका मुखर्जीने एल्विरा राडला ४-१ अशी धूळ चारली. मग मनिका व श्रीजा यांनी परतीच्या लढतीत विजय मिळवून भारताला आगेकूच करून दिली. भारतीय संघ अ-गटात चार सामन्यांतील तीन विजयांसह दुसऱ्या स्थानी राहिला. चीनने गटात पहिला क्रमांक मिळवला.

पुरुषांमध्ये भारतीय संघाने न्यूझीलंडला ३-० असे नेस्तनाबूत केले. हरप्रीत देसाईने चोई टिमोटीला ३-०, तर जी. साथियनने अल्फ्रेड डेलाला ३-० असे नामोहरम केले. मग मनुष शाहने मॅक्सवेल हेंडरसनवर ३-२ अशी मात करून भारताचा विजय पक्का केला. ४० संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेच्या राऊंड ऑफ ३२ फेरीला बुधवारपासून प्रारंभ होईल.

Mumbai : मुंबापुरी गणेश विसर्जनासाठी सज्ज; मुंबईच्या वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद

Mumbai : मित्राला अडकवण्यासाठी मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी; नोएडामधून ज्योतिषाला अटक

Pune : गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पुणेकर सज्ज; वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद

Mumbai : लालबागच्या राजाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर भीषण अपघात; साखरझोपेत असताना २ चिमुकल्यांना अज्ञात वाहनाने चिरडले, एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

भारत आणि रशियाला आम्ही गमावले! ट्रम्प यांना उशिरा सुचले शहाणपण