क्रीडा

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा २०२३ची फायनल ओव्हलला तर २०२५ची लॉर्ड‌्सवर होणार; आयसीसीची घोषणा

सर्व देशांचे कसोटी संघ सर्वतोपरी प्रयत्नशील असताना अंतिम सामना हा कुठे होणार याचा फैसला होऊ शकलेला नव्हता.

वृत्तसंस्था

पुढील वर्षी होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना लंडनमधील ओव्हल येथे होणार आहे; तर २०२५च्या फायनलचे आयोजन लॉर्ड्सवर केले जाणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) याबाबतची अधिकृत घोषणा बुधवारी केली.

पुढील वर्षी होणाऱ्या अंतिम फेरीत स्थान मिळविण्यासाठी सर्व देशांचे कसोटी संघ सर्वतोपरी प्रयत्नशील असताना अंतिम सामना हा कुठे होणार याचा फैसला होऊ शकलेला नव्हता. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना कोणत्या दोन संघांमध्ये खेळला जाणार, याबरोबरच न्यूझीलंडकडून कसोटीचे विजेतेपद कोणता संघ हिसकावून घेणार, याबाबत आतापासूनच कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

आयसीसीचे मुख्य कार्यकारी ज्योफ अल्लार्डिस यांनी सांगितले की, ‘‘२०१९ मध्ये सुरू झालेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी दोन प्रतिष्ठित मैदानांची पुष्टी करताना विशेष आनंद होत आहे.”

ते म्हणाले की, “पुढील वर्षी ओव्हल येथे आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे आयोजन करताना आम्हाला खास आनंद होत आहे. तिथे समृद्ध वारसा आणि अद्भुत वातावरण आहे. हवामान आणि जागतिक वेळेचा विचार करता हे ठिकाण अंतिम सामन्यासाठी अगदी योग्य आहे.

त्यांनी सांगितले की, “गेल्या वर्षी साउथॅम्प्टनमध्ये न्यूझीलंड आणि भारत यांच्यात झालेला अंतिम सामना मनोरंजक ठरला होता आणि मला खात्री आहे की, जगाने त्याचा आनंद घेतला असेल. चाहते ओव्हल येथे पुढील जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याची वाट पाहत आहेत.”

आगामी दौऱ्याला मान्यता

आयसीसीची वार्षिक बैठक बर्मिंगहॅम येथे झाली. यात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या निर्णयांची औपचारिक घोषणा करण्यात आली. २०२४ ते २०४७ या कालावधीतील पुरूष आणि महिलांसाठीच्या आगामी दौऱ्याच्या कार्यक्रमालाही मान्यता देण्यात आली. दरम्यान, आयसीसीने एका पत्रकाद्वारे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचेही आभार मानले

BMC Election : मुंबईतील प्रचारासाठी भाजपला हवीये यूपीतील नेत्यांची मदत; अपर्णा यादव, रवि किशनसह 'या' नेत्यांना पाठवण्याची विनंती

"लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही"; भाजपच्या रविंद्र चव्हाणांनी विलासरावांबाबत केलेल्या वक्तव्यावर रितेश देशमुखचा सणसणीत पलटवार

Mumbai : घरात प्रचाराला विरोध केल्याचा राग; शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी दहिसरमध्ये दोघांना लाथाबुक्क्यांनी तुडवलं, बेदम मारहाणीचा Video व्हायरल

'समृद्धी'वर पुन्हा थरार! धावत्या बसने अचानक घेतला पेट; चालकाच्या प्रसंगावधानामुळे थोडक्यात वाचले ३५ प्रवासी

महाराष्ट्राला पुन्हा भरणार हुडहुडी! उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे ९ ते १५ जानेवारी या कालावधीत तापमान घटणार