क्रीडा

आर. वैशालीची कांस्यकमाई; जागतिक महिला ब्लिट्झ चॅम्पियनशीप

नवीन वर्षाचा पहिलाच दिवस भारतीय बुद्धिबळासाठी विशेष ठरला. भारताच्या आर वैशालीने महिला जागतिक ब्लिट्झ चॅम्पियनशीपमध्ये कांस्य पदकाला गवसणी घातली.

Swapnil S

न्यूयॉर्क : नवीन वर्षाचा पहिलाच दिवस भारतीय बुद्धिबळासाठी विशेष ठरला. भारताच्या आर वैशालीने महिला जागतिक ब्लिट्झ चॅम्पियनशीपमध्ये कांस्य पदकाला गवसणी घातली. रॅपिड प्रकारात कोनेरू हम्पीने विजेतपद पटकावल्यानंतर आठवड्यातील भारताचे हे दुसरे पदक आहे.

वैशालीने उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या झ्यू जिनरला २.५ - १.५ असे पराभूत करत आगेकूच केली. त्यानंतर स्पर्धेच्या उपांत्य फेरीतही वैशालीने चीनी खेळाडूला मात दिली. ज्यू वेंज्यूनला ०.५ - २.५ असे नमवत वैशालीने अंतिम फेरीत प्रवेश केला.

स्पर्धेत चीनी खेळाडूंचे वर्चस्व राहिले.

पाच वेळा जगज्जेते राहिलेले आणि आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ फेडरेशनचे (फिडे) उपाध्यक्ष विश्वनाथ आनंद यांनी वैशालीचे अभिनंदन केले. कांस्य पदक जिंकल्याबद्दल वैशाली तुझे अभिनंदन. स्पर्धेतील तुझी कामगिरी अप्रतिम राहिली. वर्षाचा शेवट असा गोड झाला असल्याचे आनंद म्हणाले.

तिला बुद्धिबळात सहकार्य करायला मिळाल्याबद्दल आम्ही आनंदी आहोत. वर्ष २०२१ मध्ये आम्हाला तगडे बुद्धिबळपटू मिळतील अशी अपेक्षा होता. जगज्जेती हम्पी आणि कांस्य पदक विजेती वैशाली आमच्याकडे असल्याचे आनंद म्हणाले.

कार्लसन, इयान यांना विभागून विजेतेपद

खुल्या गटात तीन गेम अनिर्णित राहिल्याने जगातील अव्वल खेळाडू मॅग्नस कार्लसन आणि रशियाच्या इयान नेपोम्निआट्चटी यांना विजेतेपद विभागून देण्यात आले. ३ सामने अनिर्णित राहिल्यानंतर कार्लसनने विचारले की स्पर्धेचे जेतेपद विभागून दिले जाऊ शकते का? त्यानंतर हे पारितोषिक विभागून देण्याचा निर्णय घेण्यात आला. पारितोषिक विभागून देण्याचा निर्णय काहींना आवडला असेल तर काहींना नसेल. परंतु बरेच दिवस येथे राहिल्याने आम्ही कंटाळलो होतो. त्यामुळे ३ गेम अनिर्णित राहिल्याने असा निर्णय घेतल्याचे प्रसारमाध्यमांशी केलेल्या संवादादरम्यान कार्लसन म्हणाला. अशा पद्धतीने स्पर्धेचा शेवट करणे आम्हाला योग्य वाटल्याचे कार्लसन म्हणाला. या आठवड्यातील कार्लसनचा हा दुसरा सर्वात मोठा विजय आहे.

Maratha Reservation : सलग तिसऱ्या दिवशी वाहतूक विस्कळीत; CSMT परिसरात आंदोलकांचे बस्तान

Maratha Reservation: आंदोलनाची धग वाढणार; मनोज जरांगे आजपासून पाणी पिणेही बंद करणार; एकतर विजययात्रा, नाहीतर अंत्ययात्रा

Maratha Reservation : दक्षिण मुंबईत आज पुन्हा कोंडीची शक्यता

Maratha Reservation : CSMT परिसरात अस्वच्छता; राज्यभरातून अन्नपदार्थांचा ओघ वाढल्याने नासाडी

Maratha reservation protest : सुप्रिया सुळेंना आंदोलकांचा घेराव; गाडीवर बाटल्या भिरकावल्या