(संग्रहित छायाचित्र)
क्रीडा

कुस्तीपटूंचा पुन्हा बंडाचा पवित्रा; दिल्ली हायकोर्टात धाव

बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगट या कुस्तीपटूंनी शुक्रवारी पुन्हा बंडाचा पवित्रा पुकारताना न्यायालयात धाव घेतली.

Swapnil S

नवी दिल्ली : बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगट या कुस्तीपटूंनी शुक्रवारी पुन्हा बंडाचा पवित्रा पुकारताना न्यायालयात धाव घेतली. भारतीय कुस्ती महासंघाने राष्ट्रीय निवड चाचणी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. ही चाचणी थांबवावी म्हणून या कुस्तीपटूंनी दिल्ली न्यायालय गाठले आहे.

बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आल्यावर त्यांचे निकटवर्तीय संजय सिंह महासंघाच्या अध्यक्षपदी विराजमान झाले. तसेच जागतिक महासंघाने ही बंदी उठवल्यानंतर आता संजय सिंह यांच्या महासंघाने २०२४च्या आशियाई पात्रता ऑलिम्पिक स्पर्धेसाठी राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन केले आहे. मात्र याला विरोध दर्शवतानाच साक्षी, विनेश व बजरंग यांनी बंड पुकारले आहे. तसेच केंद्र शासनाने या प्रकरणात लक्ष घालावे, अशी विनंती त्यांनी केली आहे. दिल्ली येथे १० व ११ मार्च रोजी निवड चाचणी स्पर्धा होणे अपेक्षित आहे. मात्र आता या कुस्तीपटूंच्या विरोधानंतर ही स्पर्धा होणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

नवी मुंबईत अग्नितांडव! वाशीतील रहेजा रेसिडेन्सीला भीषण आग; ६ वर्षांच्या चिमूरडीसह ४ जणांचा मृत्यू, १० जखमी

मुंबईकरांनो सावधान! हवेची गुणवत्ता ढासळली, प्रदूषणात होतेय वाढ, AQI १६४ वर पोहोचला

समुद्रकिनारे धोक्यात! CRZ ‘बफर झोन’ ५०० वरून २०० मीटर करण्याचा नीती आयोगाचा प्रस्ताव, पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केली नाराजी

अंदमान-निकोबार बेटांवर चक्रीवादळ धडकणार; हवामान खात्याचा इशारा

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी दिल्लीतील हवा ‘अतिशय खराब’; दिल्लीकरांनी घेतला विषारी श्वास, हवेचा एक्यूआय ३०० च्या पुढे