क्रीडा

कुस्तीपटूंचे आंदोलन १५ जूनपर्यंत स्थगित

कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी एखाद्या महिलेला विराजमान करण्याची मागणी कुस्तीपटूंनी क्रीडामंत्र्यांकडे केली

नवशक्ती Web Desk

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंग यांच्याविरोधात लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली भारताच्या महिला कुस्तीपटूंनी गेल्या काही महिन्यांपासून आंदोलन पुकारले आहे. मात्र बुधवारी केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्याशी तब्बल पाच तास चर्चा केल्यानंतर कुस्तीपटूंनी १५ जूनपर्यंत हे आंदोलन स्थगित केल्याची माहिती बजरंग पुनिया याने दिली. त्याचबरोबर कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी एखाद्या महिलेला विराजमान करण्याची मागणी कुस्तीपटूंनी क्रीडामंत्र्यांकडे केली आहे.

“ब्रिजभूषण यांच्याविरोधातली चौकशी १५ जूनपर्यंत पूर्ण होईल, असे आश्वासन आम्हाला सरकारने दिले आहे. त्यामुळे १५ जूनपर्यंत आम्ही आमचे आंदोलन स्थगित करत आहोत. मात्र १५ जूनपर्यंत कारवाई झाली नाही तर आम्ही आमचे आंदोलन नव्याने सुरू करू. तसंच आमच्याविरोधात जे गुन्हे दाखल आहेत तेदेखील मागे घेतले जातील,” असे आश्वासन दिल्याचे बजरंग पुनियाने स्पष्ट केले.

दरम्यान, क्रीडामंत्र्यांसोबत झालेल्या या बैठकीत कुस्तीपटूंनी पाच प्रमुख मागण्या केल्या आहेत. त्यात भारतीय कुस्ती महासंघाच्या स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका घेण्यात याव्यात तसेच त्यावर एका महिलेची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात यावी. तसेच यापुढे बृजभूषण सिंग किंवा त्यांच्या कुटुंबातील कुणीही महासंघाचा भाग होऊ नये, २८ मे रोजी नव्या संसदेचे उद्घाटन होताना कुस्तीपटूंवर लावण्यात आलेले आरोप मागे घेण्यात यावेत आणि बृजभूषण यांना अटक करण्यात यावी, अशा मागण्या कुस्तीपटूंनी केल्या आहेत. या आंदोलनात प्रमुख चेहरा असलेली विनेश फोगट या बैठकीला उपस्थित राहू शकली नाही. विनेश सध्या आपल्या बलाली गावात होणाऱ्या पूर्वनियोजित पंचायत कार्यक्रमात सहभागी होणार होती.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी