एएफपी
क्रीडा

Wriddhiman Saha retirement : वृद्धिमान साहाचा क्रिकेटला अलविदा; यंदाची रणजी स्पर्धा अखेरची

Wriddhiman Saha announces retirement : भारताचा अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज वृद्धिमान साहाने सोमवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. सध्या सुरू असलेल्या रणजी स्पर्धेनंतर आपण निवृत्त होणार असल्याचे ४० वर्षीय साहाने सांगितले. साहा रणजी स्पर्धेत बंगालचे प्रतिनिधित्व करतो.

Swapnil S

नवी दिल्ली : भारताचा अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज वृद्धिमान साहाने सोमवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. सध्या सुरू असलेल्या रणजी स्पर्धेनंतर आपण निवृत्त होणार असल्याचे ४० वर्षीय साहाने सांगितले. साहा रणजी स्पर्धेत बंगालचे प्रतिनिधित्व करतो.

१७ वर्षांच्या एकूण क्रिकेट कारकीर्दीत साहाने ४० कसोटी सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले. २०१० ते २०२१ या कालावधीत त्याला ९ एकदिवसीय सामने खेळण्याची संधी मिळाली. २०२१ मध्ये मुंबईतील वानखेडे मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध त्याने शेवटचा कसोटी सामना खेळला. त्यानंतर त्याने संघातील स्थान गमावले.

बंगालकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या साहाने ट्विटरवर निवृत्तीची घोषणा केली. “क्रिकेटमधील एका सुंदर प्रवासानंतर, हा हंगाम माझा शेवटचा असेल. बंगालचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मला मिळाला आहे, मी निवृत्त होण्यापूर्वी फक्त रणजी स्पर्धेत खेळणार आहे. या अविश्वसनीय प्रवासात सहभागी झालेल्या प्रत्येकाचे आभार. अखेरचा हंगाम संस्मरणीय बनवू,” असे साहा म्हणाला.

साहाने आयपीएलमध्ये ५ संघांचे प्रतिनिधित्व करताना १७० सामने खेळले. २०२२ मध्ये गुजरात टायटन्स संघासह त्याने आयपीएल जेतेपदाचा मान मिळवला.

कारकीर्दीचा आढावा

साहाने ४० कसोटी सामन्यांत १,३५३ धावा केल्या.

यामध्ये तीन शतकांचा समावेश आहे.

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये साहाने १३८ सामन्यांमध्ये ७०१३ धावा केल्या.

साहा २००७ पासून बंगालकडून खेळत आहे. २०२२ मध्ये तो त्रिपुराला गेला. दोन वर्षे त्रिपुराचे प्रतिनिधित्व केल्यानंतर, तो २०२४ मध्ये बंगालकडून खेळण्यासाठी परतला.

आयपीएल अंतिम फेरीत शतक झळकावणारा साहा हा पहिला फलंदाज ठरला होता. २०१४ मध्ये त्याने पंजाबसाठी ही कामगिरी केली होती.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी