क्रीडा

गुडघ्याच्या दुखापतीमधून सावरत जेबूरची दमदार खेळी

तिसऱ्या मानांकित जेबूरने स्वीडनच्या खेळाडूच्या नाकी दम आणला.

वृत्तसंस्था

जागतिक क्रमवारीतील नंबर दोनची खेळाडू ट्युनिशियाची ओन्स जेबूरने स्वीडनच्या पात्रताधारक बी. मिरजेमचा ६-१, ६-३ असा पराभव करत विम्बल्डनमध्ये विजयी सलामी दिली.

जेबूरने हा सामना अवघ्या ५३ मिनिटांत दोन सेटमध्ये जिंकताना चमकदार खेळ करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. तिसऱ्या मानांकित जेबूरने स्वीडनच्या खेळाडूच्या नाकी दम आणला.

विम्बल्डनपूर्वी गुडघ्याच्या दुखापतीमुळे जेबूरने ईस्टबॉर्न आंतरराष्ट्रीयमधून माघार घेतली होती. तिने गेल्या सत्रात विम्बल्डनची उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. तिने या महिन्याच्या सुरुवातीला जर्मन ओपनचे विजेतेपद पटकाविले होते.

दरम्यान, महिला एकेरीत एलिसन रिस्के, लेसिया सुरेंको, माजा चवालिंस्काने आपापले सामने जिंकत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. अमेरिकेच्या रिस्केने स्विझर्लंडच्या यलेना इन अल्बोनला ६-२, ६-४ ने मात दिली. युक्रेनच्या सुरेंकोने इंग्लंडच्या एना बुरेजला ६-२, ६-३ ने नमविले. सुरेंकोचा दुसऱ्या फेरीत आपल्याच देशाच्या एनहेलिना कलिनिनाशी सामना होईल.

दरम्यान, पुरुष एकेरीत अमेरिकेच्या फ्रान्सिस तियाफो, टॉमी पॉल आणि स्पेनच्या जॉमे मुनारने विजयासह दुसरी फेरीत गाठली.

BMC Election: ठाकरे सेना, मनसेचे मराठी भागांवर लक्ष; जिंकणाऱ्या जागांवर तडजोडीची भूमिका

मतविभाजनासाठी भाजप बंडखोरांची टीम? शिंदे सेना, ठाकरे सेना, मनसेला बसणार फटका

अमेरिकेच्या भारत-चीन अहवालावर चीनचा तीव्र आक्षेप

चहा कशाला म्हणायचे? नवीन व्याख्या जाहीर; ‘हर्बल, फ्लॉवर टी’ला चहा म्हणणे बेकायदेशीर

सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना सदनिकांचे वाटप ऑनलाइनच; स्वीकार-नकारासाठी ५ दिवसांचा अवधी, शासन निर्णय जारी