ठाणे

बदलापुरात ११ वर्षीय मुलगी बलात्कारानंतर गरोदर; ३५ वर्षीय नराधमाला तेलंगणातून अटक

बदलापूर शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका ११ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिला गर्भवती करणाऱ्या ३५ वर्षीय नराधमाला अखेर पोलिसांनी तेलंगणा येथून अटक केली आहे.

Swapnil S

बदलापूर : बदलापूर शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका ११ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिला गर्भवती करणाऱ्या ३५ वर्षीय नराधमाला अखेर पोलिसांनी तेलंगणा येथून अटक केली आहे. या घटनेने शहरात संतापाची लाट उसळली आहे. आरोपीला न्यायालयाने ३१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

जून महिन्यात बदलापुरातील एका बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या कुटुंबातील ११ वर्षीय मुलीवर हा अत्याचार घडला. आरोपी नरेश उर्फ नागेश दाडे याने मुलीच्या घरात कोणी नसल्याचे पाहून घरात प्रवेश केला आणि तिच्यावर अत्याचार केला. आरोपीने मुलीला धमकी दिली की जर तिने हा प्रकार कोणाला सांगितला तर तिला जीवे मारले जाईल. त्यामुळे, भीतीने पीडित मुलगी हा भयंकर प्रकार गुपचूप सहन करत राहिली.

जुलै महिन्यात मुलीची प्रकृती खालावत चालल्यामुळे तिच्या पालकांनी तिला डॉक्टरांकडे नेले. परंतु तिला साधे पोटदुखीचे औषध देण्यात आले. तिच्या त्रासात कोणतीही सुधारणा न झाल्यामुळे तिला उल्हासनगरच्या सेंट्रल हॉस्पिटलमध्ये नेले गेले, जिथे डॉक्टरांनी तपासणी केली असता ती पाच आठवड्यांची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. या धक्कादायक माहितीने तिच्या पालकांवर आकाश कोसळले आणि त्यांनी तत्काळ बदलापूर पोलीस ठाण्यात या घटनेची तक्रार दाखल केली. तेलंगणात आरोपीचा ठावठिकाणा सापडल्यानंतर, पोलिसांनी विशेष पथक तयार करून त्याला सापळा रचून अटक केली.

आरोपी नागेश दाडे याला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे न्यायालयाने त्याला ३१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Maratha Reservation : सलग तिसऱ्या दिवशी वाहतूक विस्कळीत; CSMT परिसरात आंदोलकांचे बस्तान

Maratha Reservation: आंदोलनाची धग वाढणार; मनोज जरांगे आजपासून पाणी पिणेही बंद करणार; एकतर विजययात्रा, नाहीतर अंत्ययात्रा

Maratha Reservation : दक्षिण मुंबईत आज पुन्हा कोंडीची शक्यता

Maratha Reservation : CSMT परिसरात अस्वच्छता; राज्यभरातून अन्नपदार्थांचा ओघ वाढल्याने नासाडी

Maratha reservation protest : सुप्रिया सुळेंना आंदोलकांचा घेराव; गाडीवर बाटल्या भिरकावल्या