ठाणे

भाड्याने रूम देण्याच्या नावाखाली १७ लाखांची फसवणूक

याप्रकरणी भामट्याविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Swapnil S

भिवंडी : एका भामट्याने भाडेतत्त्वावर रूम देण्याच्या नावाखाली ६ जणांकडून हेवी डिपॉझिट म्हणून १७ लाख ५० हजार रुपये उकळले. त्यानंतर भाडेकरूंनी रूम न मिळाल्याने पैशांची मागणी केल्यावर भामट्याने सर्वांना शिवीगाळ करून मारहाणीची धमकी दिल्याची घटना भिवंडीतून समोर आली आहे. याप्रकरणी भामट्याविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसीम अहमद हसनैन शाह असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसीमने फिर्यादी रेश्मा ईसराईल खान हिच्याकडून शांतीनगर हद्दीतील गैबीनगर येथील सुनी जामा मशिदीजवळ रूम भाड्याने देतो म्हणून हेवी डिपॉझिट २ लाख रुपये घेतले. तसेच अन्य ५ जणांकडून १५ लाख ५० हजार रुपये उकळले आहेत. मात्र वसीमने ६ जणांपैकी एकालाही भाड्याने रूम दिलेली नाही. वसीमच्या नावावर एकही फ्लॅट नसताना त्याने त्याच्या नावावर सर्व फ्लॅट असल्याचे भासवून ६ जणांकडून १७ लाख ५० रुपये घेऊन सर्वांची फसवणूक केली आहे.

याप्रकरणी रेश्मा खानच्या फिर्यादीवरून वसीमविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि संतोष तपासे करीत आहेत.

मराठवाड्यात अतिवृष्टीचा कहर; ६७ गावांचा संपर्क तुटला, ८ जणांचा मृत्यू

Maharashtra Rain Alert : राज्यभरात पाऊस वाढण्याची धास्ती; कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वादळी पावसाची शक्यता

धाराशिव : नातू अन् आजी अडकले पुरात; खासदार ओमराजे निंबाळकर उतरले थेट पाण्यात, व्हिडिओ व्हायरल

राज्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर होण्याची शक्यता; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी, मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार निर्णय

Yavatmal : धक्कादायक! शिक्षकच बनला भक्षक; विद्यार्थिनीवर ९ महीने बलात्कार, गर्भपाताच्या गोळ्यांनी घेतला जीव