ठाणे

ठाण्यात २४ तासांचा शटडाऊन; १३ ते १४ डिसेंबरपर्यंत टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा

ठाणे महानगरपालिकेला मे. स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा शुक्रवार, दि.१३ डिसेंबर रोजी सकाळी ९.०० वा. ते शनिवार, दि.१४ डिसेंबर रोजी सकाळी ९.०० वा पर्यंत असा २४ तासांचा शटडाऊन घेऊन देखभाल, दुरुस्ती आवश्यक कामे तातडीचे करून घेण्यात येणार आहेत.

Swapnil S

ठाणे : ठाणे महानगरपालिकेला मे. स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा शुक्रवार, दि.१३ डिसेंबर रोजी सकाळी ९.०० वा. ते शनिवार, दि.१४ डिसेंबर रोजी सकाळी ९.०० वा पर्यंत असा २४ तासांचा शटडाऊन घेऊन देखभाल, दुरुस्ती आवश्यक कामे तातडीचे करून घेण्यात येणार आहेत. तथापि ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेचे नियोजन करून टप्प्याटप्प्याने ठाणे शहरात एक वेळ पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.

त्यानुसार घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कम्पाऊंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ, आनंदनगर, कासारवडवली, ओवळा, इत्यादी ठिकाणाचा पाणीपुरवठा शुक्रवार, दि.१३ डिसेंबर रोजी सकाळी ०९.०० ते रात्री ९.०० वाजेपर्यंत बंद राहील. तर समतानगर, ऋतुपार्क, सिद्धेश्वर, इंटरनिटी, जॉन्सन, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, कळव्याच्या व मुंब्राचा काही भाग दि.१३ डिसेंबर रोजी रात्री ९.०० ते १४ डिसेंबर शनिवार रोजी सकाळी ०९.०० वा.पर्यंत पाणीपुरवठा बंद राहील. अशारीतीने टप्प्याटप्प्याने एक वेळ पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. वरील शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.

तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा व ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

FSSAI चा दणका! दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींप्रकरणी नेस्ले, पेप्सिको, कोका-कोलासह मोठ्या ब्रँड्सना १५० हून अधिक नोटिसा

Toxic चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमात दुर्घटना; साउंड सिस्टम कोसळून ४ जण जखमी, Video

गर्दीच्या नियोजनासाठी उड्डाणपूल, दुभाजकांवर लोखंडी बॅरिकेड्सचे ग्रीन कव्हर; गणेशोत्सवात लालबाग-परळ परिसरात विशेष खबरदारी

Mumbai : गणपती आगमन मिरवणुकीला गालबोट! भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळून २ ठार, ५ जखमी; VIDEO

कुर्ला-वांद्रे पॉड टॅक्सी प्रकल्प: बांधकामावर स्वतंत्र अभियंता ठेवणार नजर; AI वर चालणाऱ्या ड्रायव्हरलेस यंत्रणेत असतील २२ स्थानके