ठाणे

इमारतीसाठी खणलेल्या खड्ड्यात पडून ७ वर्षीय मुलाचा मृत्यू

कोपरखैरणे सेक्टर-५ मध्ये इमारतीच्या बांधकामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून एका ७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. अंकित पानसिंग ठनगुगा असे या दुर्घटनेत मृत झालेल्या मुलाचे नाव आहे.

Swapnil S

नवी मुंबई : कोपरखैरणे सेक्टर-५ मध्ये इमारतीच्या बांधकामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून एका ७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. अंकित पानसिंग ठनगुगा असे या दुर्घटनेत मृत झालेल्या मुलाचे नाव आहे. ज्या बांधकाम साइडवरील खड्ड्यात पडून लहानग्या अंकितचा मृत्यू झाला. त्या खड्ड्याच्या आजूबाजूला सुरक्षिततेच्या दृष्टीने कुठल्याही प्रकारची उपाययोजना केली नसल्यामुळे अंकित खेळता खेळता त्यात पडल्याचे आढळून आले आहे. कोपरखैरणे पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

या दुर्घटनेत मृत झालेला अंकित हा कोपरखैरणे सेक्टर-५ मध्ये राहण्यास होता. तसेच तो कोपरखैरणे सेक्टर-४ मधील जिजामाता कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकत होता. बुधवारी सायंकाळी अंकित शाळेतून घरी आल्यानंतर तो परिसरातील मुलांसह खेळण्यासाठी बाहेर पडला होता. यावेळी अंकित खेळत असताना महापालिका शाळेच्या बाजूला इमारतीच्या बांधकामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पाय घसरून पडला. यावेळी अंकितसह खेळणाऱ्या मुलांनी तत्काळ याबाबतची माहिती आपल्या पालकांना दिल्यानंतर नागरिकांनी त्याठिकाणी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी खड्ड्यातील पाण्यात बुडालेल्या अंकितला बाहेर काढून रुग्णालयात नेले. मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

गणपती गेले गावाला...! 'पुढच्या वर्षी लवकर या'चा घुमला जयघोष; दहा दिवसांच्या गणेश मूर्तीचे उत्साहात विसर्जन

Mumbai : लालबागचा राजाच्या विसर्जनाला विलंब? तराफ्यावर मूर्ती चढवताना अडचणी

Maharashtra : बाप्पाच्या निरोपावेळी दुर्दैवी घटना; राज्यात ७ जणांचा मृत्यू

मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा गजाआड; गोंधळ माजवण्यासाठी पाठवला संदेश

चौकशीची मागणी माझी वैयक्तिक! अंजना कृष्णा धमकीप्रकरणी मिटकरी यांचे घूमजाव