ठाणे

काकोळे डोंगरावर तरुणीचा कुजलेला मृतदेह आढळला

अंबरनाथ येथील आनंद नगर एमआयडीसीजवळील काकोळे गावाजवळील डोंगरावरील झाडाझुडपात एका ३० वर्षीय तरुणीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह स्थानिक ग्रामस्थांना आढळला आहे.

Swapnil S

उल्हासनगर : अंबरनाथ येथील आनंद नगर एमआयडीसीजवळील काकोळे गावाजवळील डोंगरावरील झाडाझुडपात एका ३० वर्षीय तरुणीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह स्थानिक ग्रामस्थांना आढळला आहे. या तरुणीची पाच ते सहा दिवसांपूर्वी ओढणीने गळा आवळून हत्या करण्यात आली असून पावसामुळे मृतदेह पूर्णपणे कुजला आहे. तर याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तरुणीची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी तपास पथके सक्रिय केली आहेत.

अंबरनाथ येथील आयुध निर्माणी परिसरातील भर चोकात एका २५ वर्षीय तरुणाची रविवारी रात्री काही अज्ञात हल्लेखोरांनी निर्घृण हत्या केल्याची घटना ताजी असतानाच आणि या घटनेतील फरार आरोपींचा पोलीस शोध घेत असतानाच मंगळवारी शहरात आणखी एका तरुणीची गळा आवळून डोंगरात निर्घृण हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. अंबरनाथ पूर्वेतील आनंदनगर एमआयडीसीपासून जवळच असलेल्या काकोळे गावाजवळील डोंगरावर काही तरुण खेकडे पकडण्यासाठी गेले होते. या दरम्यान त्यांना एका झुडपात एका तरुणीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर त्या तरुणांनी याबाबत शिवाजीनगर पोलिसांना माहिती दिली.

१९ तारखेला या तरुणीची ओढणीने गळा आवळून हत्या करत तिचा मृतदेह डोंगरावरील झाडाझुडपात टाकण्यात आला आहे. या तरुणीच्या अंगावर मेहंदी रंगाचा सलवार, हिरव्या रंगाची ओढणी, लाल रंगाची चप्पल आणि हातात लाल मनी असलेली धातूची अंगठी घातलेली आहे. सध्या या तरुणीचा मृतदेह ओळख पटवण्यासाठी शितगृहात ठेवण्यात आला असून तिची ओळख पटवण्याचे पोलीस शोध घेत आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी दिली असून याप्रकरणी आरोपींचा शोध घेत असल्याचेही त्यांनी सांगितले.

दिल्ली विमानतळावर प्रवाशाला पायलटकडून मारहाण; सोशल मीडियावर संताप, एअर इंडिया एक्सप्रेसची कारवाई

"आज तुमच्या हक्काचा दिवस..." ; नगरपरिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना आवाहन

अंबरनाथ नगरपरिषद निवडणूक : मतदानाच्या दिवशी अंबरनाथमध्ये गोंधळ; २०८ महिला भिवंडीतून आणल्याचा दावा, पोलिसांचा हस्तक्षेप

चीनमधील कॉन्सर्टमध्ये रोबोट्सचा भन्नाट डान्स; एलन मस्क यांची एका शब्दात प्रतिक्रिया, VIDEO व्हायरल

आसाममध्ये राजधानी एक्सप्रेसची हत्तींच्या कळपाला धडक; ७ हत्तींचा मृत्यू, ट्रेनचे पाच डबे घसरले