ठाणे

मनसेच्या सतर्कतेने ठाकुर्ली पुलावरील अपघात टळला, कचरावाहू वाहनांच्या देखभाल दुरुस्तीची गरज

मनसे पदाधिकारी प्रितेश म्हामुणकर व नागरिकांनी यांनी पुलावरील झाडांच्या फांद्यांनी व पालापाचोळ्याने रस्ता साफ केला

शंकर जाधव

डोंबिवली जवळील ठाकुर्ली येथील स.व.जोशी शाळेजवळील पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या पुलावर कचरावाहू वाहनातील चिकट पाणी रस्त्यावर पडल्याने पाच ते सहा दुचाकी घसरून पडल्या. सुदैवाने यात वाहनचालक जखमी झाले नाहीत. मनसे पदाधिकारी प्रितेश म्हामुणकर व नागरिकांनी यांनी पुलावरील झाडांच्या फांद्यांनी व पालापाचोळ्याने रस्ता साफ केला. त्यामुळे पुलावर वाहनांना धावण्यास अडचण येत नव्हती. मनसेच्या सतर्कतेने पुढील अनर्थ टळला असून अपघात होऊ नये म्हणून काळजी घेतल्याबद्दल डोंबिवलीकरांनी आभार  मानले. तर वाहतूक पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी पुलावर धाव घेतली. कचरावाहू वाहनांच्या देखभाल दुरुस्तीची गरज असून पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून वाहन विभागाला पत्र देण्यात आले आहे.  

मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास पालिकेच्या कचरावाहू वाहन ठाकुर्ली पुलावरून पश्चिमेकडून पूर्वेला जात असताना कचऱ्याचे चिकट पाणी पडत होते. त्यामुळे रस्ता गुळगुळीत होऊन दुचाकी पडत होत्या. मनसे विद्यार्थी सेना शहर सचिव प्रितेश म्हामुणकर हे दुचाकीवरून जात असताना त्यांना पुलामध्ये सदर प्रकार दिसला. सकाळी १० वाजता प्रसंगावधान राखून म्हामुणकर यांनी नागरिकांच्या मदतीने झाडांच्या फांद्यांनी व पालापाचोळ्याने रस्ता साफ केला. वाहतूक पोलीस निरीक्षक उमेश गीते यांना याची माहिती मिळताच त्यांनी वाहतूक पोलिसांना घटनास्थळी पाठविले. मनसेच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला. मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, पदाधिकारी संदीप ( रमा ) म्हात्रे, प्रेम पाटील, गौरी कुडतकर, संजय गुप्ते, आणि हेमंत दाभोळकर यांनी म्हामुणकर यांच्या कार्याचे कौतुक केले.

कचरावाहू वाहनांची देखभाल दुरुस्तीची गरज

डोंबिवली पश्चिमेत १९ तर डोंबिवली पूर्वेला ४० कचरावाहू गाड्या आहे.यातील अनेक वाहनांची देखभाल दुरुस्तीला करणे गरजेचे झाले आहे.काही गाड्याचे पत्रे सडल्याने त्यातून ओला कचऱ्याने पाणी रस्त्यावर पडते.त्यामुळे रस्ता गुळगुळीत होऊन वाहने घसरण्याची शक्यता असते.पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून वाहन दुरुस्ती विभागाला पत्र दिले आहे.वेळेवर हा कचरावाहू गाडी वेळेवर देखभाल दुरुस्ती न झाल्यास भविष्यात अपघात होऊ शकतो. याचे गांभिर्य ओळखून घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून लवकरात लवकर पाऊल उचलणे आवश्यक आहे.

हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली! पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !

आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

गिलचा पुन्हा शतकी नजराणा; चौथ्या दिवसअखेर भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर

जुलै महिना कसा जाईल? बघा कुंभ आणि मीन राशीचे भविष्य

एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल