ठाणे

परवाना नूतनीकरण न केलेल्या मटण, चिकन विक्रेत्यांवर कारवाई

टिटवाळा, मोहने येथील अनधिकृत चिकन व मटण विक्रेत्यांवर काल दिवसभरात धडक कारवाई करून त्यांच्या परवान्यांची तपासणी करण्यात आली.

Swapnil S

डोंबिवली : महापालिकेच्या बाजार व परवाना विभागामार्फत ज्या चिकन व मटण विक्रेत्यांनी अद्याप परवाना घेतलेला नाही अथवा घेतलेल्या परवान्याचे नूतनीकरण केलेले नाही, अशा टिटवाळा, मोहने येथील अनधिकृत चिकन व मटण विक्रेत्यांवर काल दिवसभरात धडक कारवाई करून त्यांच्या परवान्यांची तपासणी करण्यात आली.

या तपासणीमध्ये ८ चिकन व मटण विक्रेत्यांनी परवाना नूतनीकरण न केल्याने त्यांना विनापरवाना व्यवसाय करीत असल्याबाबत नोटीस बजावण्यात आल्या आहेत. तर ४ दुकानदारांचे वजनकाटे जप्त करण्यात आले आहेत. ज्या विक्रेत्यांनी परवाना घेतलेला नाही अशा १२ विक्रेत्यांकडून रक्कम ३०,००० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

चिकन व मटण विक्रेत्यांनी तातडीने परवान्याचे नूतनीकरण करावे तसेच ज्या विक्रेत्यांनी अद्यापही परवाना काढलेला नाही अशा विक्रेत्यांनी तातडीने परवाना काढावा असे आवाहन उप आयुक्त (परवाना विभाग) वंदना गुळवे यांनी केले आहे. अशा प्रकारची कार्यवाही सातत्याने केली जाणार असल्याची माहिती परवाना विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकूर यांनी दिली आहे.

Asia Cup 2025 : भारताची आज यूएईशी सलामी! सूर्यकुमारच्या सेनेला आव्हान देण्यासाठी राजपूत यांच्या प्रशिक्षणाखाली अमिराती सज्ज

नागरिकांना लुटून तिजोरी भरू नका; न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले, स्टॅम्प ड्युटीच्या मुद्द्यावरून कानउघाडणी

गर्भधारणा रोखणाऱ्या किशोरवयीन मुलींच्या गोपनीयतेचे रक्षण करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश

मोहित कंबोज यांचा राजकारण संन्यास?

सी. पी. राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती; राधाकृष्णन यांना ४५२, तर रेड्डी यांना ३०० मते, विरोधकांची १४ मते फुटली