ठाणे

डोंबिवलीनंतर कल्याणातही पाणीप्रश्न पेटला; ‘अ’ प्रभाग कार्यालयावर शिवसेनेचा हंडा मोर्चा

पाणीटंचाईने त्रस्त झालेल्या नागरिकांना गेल्या आठवड्यात डोंबिवली आजदेपाडा, आजदेगाव, डोंबिवली जिमखाना येथील रहिवाशांनी डोंबिवलीतील एमआयडीसी विभाग कार्यालयात ठिय्या आंदोलन केले होते.

Swapnil S

डोंबिवली : पाणीटंचाईने त्रस्त झालेल्या नागरिकांना गेल्या आठवड्यात डोंबिवली आजदेपाडा, आजदेगाव, डोंबिवली जिमखाना येथील रहिवाशांनी डोंबिवलीतील एमआयडीसी विभाग कार्यालयात ठिय्या आंदोलन केले होते. अंनतम येथील रहिवाशांनी देखील विकासच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. डोंबिवलीप्रमाणे कल्याणमध्येही पाणीटंचाई जाणवत असल्याने येथील नागरिकांनी शिवसेनेकडे आपल्या समस्या सांगितली. कल्याण जवळील अटाळी, वडवली, मोहने, आंबिवली परिसरातील नागरिकांनी मंगळवार, ९ जुलै रोजी कल्याण पालिकेच्या अ`प्रभाग कार्यालयावर हंडा मोर्चा काढला.

मंगळवारी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी हंडा आणि बादल्या घेऊन केडीएमसीच्या ‘अ’ प्रभाग कार्यालयावर मोर्चा काढला. शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील हेही सहभागी झाले होते. मोर्चा कार्यालयात येताच कर्मचारी वर्गाने मोर्चेकऱ्यांना अडविण्याचा प्रयत्न केला; मात्र शहरप्रमुख पाटील यांनी कर्मचाऱ्यांना बाजूला केले. मोर्चेकऱ्यांनी कार्यालयात घोषणा देत अधिकाऱ्यांच्या दालनात गेले.

यावेळी शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील म्हणाले, अटाळी, वडवली, मोहने, आंबिवली या भागात गेले वर्षभर पाण्याची समस्या आहे. आजचे उपशहरप्रमुख दुर्योधन पाटील, माजी नगरसेविका हर्षली थवील, विभागप्रमुख रमण तरे, रमेश पाटील, शाखाप्रमुख शिवसैनिक माझ्याकडे पाठपुरावा करत पाणी समस्या सांगितली होती. आठ दिवसांपूर्वी मी आयुक्तांशी चर्चा करून या भागातील पाणी समस्येची माहिती दिली होती; मात्र पाणी समस्या सुटली नसल्याने कार्यालयावर मोर्चा काढावा लागला. अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर पाण्याचा प्रश्न सोडवू, असे आश्वासन दिले. शिवसेना हे नेहमी जनतेसाठी रस्त्यावर उतरते. सत्ता जरी असली, तरी जनतेकरता अधिकाऱ्यांना जाब विचारला.

- अशोक घोडे, केडीएमसी कार्यकारी अभियंता

वास्तविक पाहता या भागातील पंप हाऊस आणि पंप जुने असून, या आठवड्यात नवीन पंप लावण्यात येतील. ज्या वोलमनची तक्रार असेल, त्यांच्यावर पालिका प्रशासन नक्की कारवाई करून बदल्या करू. अटाळी, वडवली, मोहने, आंबिवली या भागातील पाणी समस्या दोन दिवसात सोडविण्याचा नक्की प्रयत्न करू. चारही पंप बदलले की, हा प्रश्न राहणार नाही.

समुद्रातील मासेमारीला लहान बोटी मुकणार; शासनाच्या निर्णयाला मच्छीमार कृती समितीचा विरोध

कामगारांच्या कामाचे तास वाढणार नाहीत; कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडून स्पष्टीकरण

मुंबईत घुसले १४ दहशतवादी, ३४ वाहनांमध्ये मानवी बॉम्बस्फोट घडवणार; अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना धमकी

Mumbai : लालबागच्या राजाचे अंतिम दर्शन घ्यायचे आहे? मग 'या' मार्गावर द्या बाप्पाला शेवटचा निरोप!

“शशी थरूर यांना स्पर्धक मिळाला”; पंजाबच्या महापुराबाबत पठ्ठ्याचं तोडकं-मोडकं इंग्रजी ऐकून नेटकरी लोटपोट, Video व्हायरल