अक्कलकोटला दर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; आजी-आजोबा आणि ८ वर्षांच्या नातवाचा मृत्यू, आई-वडील गंभीर 
ठाणे

अक्कलकोटला दर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; आजी-आजोबा आणि ८ वर्षांच्या नातवाचा मृत्यू, आई-वडील गंभीर

स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोटला निघालेल्या कल्याणमधील भरांबे कुटुंबाच्या प्रवासाचा भीषण अपघातात दुर्दैवी अंत झाला.

Swapnil S

दानीष आझमी / कल्याण

स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोटला निघालेल्या कल्याणमधील भरांबे कुटुंबाच्या प्रवासाचा भीषण अपघातात दुर्दैवी अंत झाला. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात शेळफळ आणि तेलंगवाडी गावांदरम्यान शुक्रवारी दुपारी कार आणि कंटेनरची समोरासमोर धडक झाली. या दुर्घटनेत आठ वर्षांच्या चिमुरड्यासह त्याच्या आजी-आजोबांचा मृत्यू झाला, तर आई-वडील गंभीर जखमी झाले.

या अपघातात पार्थ तुषार भरांबे (८), आजोबा विलास चांगू भरांबे (६६) आणि आजी शोभा विलास भरांबे (६३) यांचा मृत्यू झाला. तर वडील तुषार विलास भरांबे आणि आई पूनम तुषार भरांबे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

भरांबे कुटुंब शुक्रवारी सकाळी कल्याणहून कारने अक्कलकोटच्या दर्शनासाठी रवाना झाले होते. मोहोळ तालुक्यात त्यांच्या कारची कंटेनरशी जोरदार धडक झाली. अपघाताची माहिती मिळताच जखमींना रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिघांचा जागीच मृत्यू झाला.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

सक्तीची सेवानिवृत्ती शिक्षा नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

आणीबाणी ही चूक; सोनिया गांधी यांचे विधान, इंदिराजींनाही खंत वाटल्याचा मुलाखतीत दावा

गोकुळमध्ये रस नाही; सरकारी संचालक नेमण्याच्या आरोपावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा

अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडली; 'कौन बनेगा करोडपती'चं शूटिंग थांबवलं

बिश्नोईचा मुख्य हस्तक हॅरी बॉक्सर अमेरिकेत ताब्यात; रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबाराचा सूत्रधार