ठाणे

Video|अंबरनाथ-बदलापूर: भररस्त्यात कौटुंबिक वादाचा थरार; कुटुंबाच्याच वाहनाला धडक देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न

अंबरनाथ येथील चिखलोली भागात मंगळवारी संध्याकाळी कौटुंबिक वादातून घरातीलच व्यक्तीने दुसऱ्या वाहनातील आपल्याच कुटुंबातील सदस्यांच्या वाहनाला समोरून जोरदार धडक देत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे.

Swapnil S

उल्हासनगर : अंबरनाथ येथील चिखलोली भागात मंगळवारी संध्याकाळी कौटुंबिक वादातून घरातीलच व्यक्तीने दुसऱ्या वाहनातील आपल्याच कुटुंबातील सदस्यांच्या वाहनाला समोरून जोरदार धडक देत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत माथेफिरू वाहन चालकाच्या धडकेत राज्य महामार्गावरील इतर दोन नागरिकही गंभीर जखमी झाले आहेत.

अंबरनाथ, बदलापूर शहराच्या वेशीवरील चिखलोली येथून जाणाऱ्या कल्याण-बदलापूर राज्य महामार्गावरील हॉटेल एस थ्री पार्क समोरील अंबरनाथ दिशेने येणाऱ्या रस्त्यावर एक वाहन चालक भरधाव वाहनाने नागरिकांना चिरडत असल्याची घटना समोर आली. बदलापूर येथे राहणारे सतीश शर्मा यांचे वडिल बिंदेश्वर शर्मा हे त्यांच्या कुटुंबातील सतीशची पत्नी, नातु तसेच कुटुंबातील इतर सदस्यांना आपल्या कुलाबा मुंबई येथील निवासस्थानी आपल्या वाहनाने घेवून जात होते. मात्र सतीश यांचा पत्नी तसेच कुटूंबातील इतर सदस्यांसोबत झालेल्या वादाच्या रागातून सतीश याने आपल्या कुटुंबाच्या वाहनाचा पाठलाग करत राज्य महामार्गावरील त्यांच्या वडिलांच्या दुसऱ्या वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिली. तसेच रस्त्यावरील दोन पादचाऱ्यांना फरफटत नेले. त्यानंतर पुन्हा पुढे नेलेले वाहन मागे वळून दुसऱ्या वाहनातील आपल्याच कुटूंबाच्या वाहनाला समोरून जोरदार धडक दिली.

या घटनेत दुसऱ्या वाहना मागे असलेले मोटर सायकलस्वार ओम चव्हाण व हर्ष बेलेकर यांना जोरात धडक बसून ते गाडी खाली आल्याने जखमी झाले. यानंतर रस्त्यावरील नागरिकांनी जखमींना जवळील रूग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी रात्री उशिरा आरोपी विरोधात पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू होती.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत