ठाणे

ऑनलाईनच्या माध्यमातून चरस विकणाऱ्यास अटक

Swapnil S

ठाणे : इंस्टाग्राम व ऑनलाईन चरस विक्रीचा पर्दाफाश ठाणे क्राईम ब्रांचच्या युनिट पाचच्या पथकाने केला आहे. पोलिसांनी रिषभ संजय भालेराव (२८) याला आटक केली असून त्याच्याकडून ६४ किलो गांजा, चरस व चरस ऑइल असा ३१ लाखांचा अमली पदार्थ साठा हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली.

ठाण्यातील इंदिरानगर भाजी मार्केट येथे एक व्यक्ती गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखा युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी इंदिराजगर भाजी मार्केट परिसरात सापळा लावला. यावेळी एका संशयित व्यक्तीस पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्यांच्याकडे ३ किलो २०० ग्रॅम गांजा आढळून आला. याप्रकरणी वागळे स्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून रिषभची अधिक चौकशी केली असता त्याने त्याच्या बदलापूर येथील घरात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ साठा लपवून ठेवल्याचे समोर आले आहे. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने बदलापूर तेथील आरोपीच्या घरातून ६० किलो ५०० ग्रॅम गांजा, २९० ग्रॅम चरस आणि १९ बाटल्या चरस ऑइल (हॅश) असा अमली पदार्थ साठा जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थाची किमत ३१ लाख रुपये असल्याची माहिती पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस