ठाणे

ठाण्यातून अयोध्या आस्था विशेष ट्रेन रवाना; जय श्रीरामच्या गजरात ट्रेनला हिरवा झेंडा

Swapnil S

ठाणे : भाजपतर्फे श्रीरामाच्या दर्शनासाठी सोडण्यात आलेल्या 'अयोध्या आस्था' विशेष ट्रेनला जय श्रीरामच्या गजरात बुधवारी रात्री हिरवा झेंडा दाखविण्यात आला. भाजपचे आमदार निरंजन डावखरे, माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, संजीव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाणे रेल्वे स्थानकात ढोल वाजवत कार्यकर्त्यांनी ट्रेनमधील भाविकांना निरोप देण्यात आला.

अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिरात दर्शनासाठी जाण्याची इच्छा असलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघातील रामभक्तांसाठी भाजपने 'अयोध्या आस्था' विशेष ट्रेन आयोजित केली होती. त्यानुसार सुमारे १४०० भाविकांना घेऊन अपूर्व जल्लोषात ट्रेनला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. ठाणे रेल्वे स्थानक क्र. ७ वरून रात्री साडेअकराच्या सुमारास आस्था ट्रेन रवाना झाली. त्यावेळी जय श्रीराम, वंदे मातरम, जय सियाराम, भारतमाता की जयच्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले होते. यावेळी आमदार डावखरे यांच्यासह विनय सहस्त्रबुद्धे, संजीव नाईक, भाजपचे ठाणे लोकसभा प्रभारी जयप्रकाश ठाकूर, प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, विभागीय सचिव हेमंत म्हात्रे, ठाणे शहर भाजपचे अध्यक्ष संजय वाघुले, ठाणे विधानसभा निवडणूक प्रमुख सुभाष काळे, माजी नगरसेवक भरत चव्हाण, संदीप लेले आदींची उपस्थिती होती.

दरम्यान, भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रेनची बुकिंग व्यवस्था, भाविकांची नोंदणी आणि भोजन व्यवस्था करण्यात आली आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस