बदलापुरातील १९ रस्ते होणार वन-वे! नगरपरिषद आणि वाहतूक पोलिसांचा आराखडा तयार प्रातिनिधिक प्रतिमा
ठाणे

बदलापुरातील १९ रस्ते होणार वन-वे! नगरपरिषद आणि वाहतूक पोलिसांचा आराखडा तयार

शहरातील वाढती वाहतूककोंडी कमी करण्यासाठी बदलापूरमधील १९ रस्त्यांवर एकेरी वाहतूक (वन-वे) लागू करण्यात येणार आहे.

Swapnil S

बदलापूर : शहरातील वाढती वाहतूककोंडी कमी करण्यासाठी बदलापूरमधील १९ रस्त्यांवर एकेरी वाहतूक (वन-वे) लागू करण्यात येणार आहे. सिग्नल यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतरही काही प्रमुख रस्त्यांवरील वाहतूककोंडी कायम असल्याने नगर परिषद आणि वाहतूक पोलिसांनी हा निर्णय घेण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत.

वाहतूककोंडीवर उपाय म्हणून नगर परिषद आणि वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी शहरातील रस्त्यांची पाहणी करून एकेरी व दुहेरी वाहतुकीचा आराखडा तयार केला आहे. त्यानुसार पूर्व आणि पश्चिम भागातील १९ रस्त्यांवर एकेरी वाहतूक सुरू करण्यात येणार आहे.

पूर्वेकडील डी. जी. वन ते एलजी शोरूम ते उड्डाणपूल, कात्रप चौक ते ममता हॉस्पिटल, ममता हॉस्पिटल ते घोरपडे चौक, जुनी नगरपालिका इमारत ते मॅक्स शोरूम, नवरत्न हॉटेल ते जुनी नगरपालिका इमारत, गांधी चौक ते शिवाजी चौक ते आपटेवाडी नाका, अभ्युदय बँक ते चितळे शॉप, रेल्वे स्थानक ते मातोश्री हॉटेल, संजीवनी हॉलमार्गे अंबिका हॉटेल ते विक्रांत वाइन्स आणि सागर हॉटेलसमोरील रस्त्याचा यात समावेश आहे.

पश्चिम भागातील उल्हास नदी पूल ते सोनिवली, बदलापूर गाव ते रमेशवाडी, स्वामी समर्थ चौक ते बाजारपेठ, आदिती बँक्वेट ते चिंतामणी मंदिर, ठाणे जनता बँक ते महादेव मोबाईल शॉप, राज कॉम्प्युटर अकादमी ते मनस्वी मोटर ट्रेनिंग स्कूल, मोरे खानावळ ते गोविंद धाम टॉवर ते साईकृपा हॉस्पिटल, अपूर्व हॉस्पिटल ते भाग्यश्री विद्यालय आणि जाधव मार्केटजवळील खाऊ गल्ली या मार्गांचाही वन-वे आराखड्यात समावेश आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

शेकोटीसाठी कचरा जाळल्यास पाच हजारांचा दंड! प्रदूषण रोखण्यासाठी ठाणे महापालिकेचा दणका

Dombivli : २४ तासांऐवजी ३६ तास पाणीपुरवठा बंद; रहिवासी वैतागले; कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू

अग्निवीरांचा डेटा विकण्याचा प्रयत्न; ५०० डॉलरसाठी १४ वर्षीय हॅकरचे कृत्य

उद्धव ठाकरे पुढील महिन्यात दिल्ली दौऱ्यावर; राहुल गांधींची घेणार भेट

सीमांकन विधेयकासाठी बहुमताच्या शोधात - काँग्रेस