'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
ठाणे

बदलापूरमधील 'सिग्नल' आता मराठीत; इंग्रजी शब्दांसह अंकांतही बदल

शहरातील वाहतूककोंडी टाळण्यासाठी रस्त्यांवर बसविण्यात आलेल्या सिग्नल यंत्रणेत आता मराठीचा वापर करण्यात आला असून, नागरिकांना सिग्नलवर 'थांबा' आणि 'जा' हे शब्द तसेच मराठी अंक पाहायला मिळणार आहेत.

Swapnil S

बदलापूर : शहरातील वाहतूककोंडी टाळण्यासाठी रस्त्यांवर बसविण्यात आलेल्या सिग्नल यंत्रणेत आता मराठीचा वापर करण्यात आला असून, नागरिकांना सिग्नलवर 'थांबा' आणि 'जा' हे शब्द तसेच मराठी अंक पाहायला मिळणार आहेत. यापूर्वी सिग्नल यंत्रणेत 'स्टॉप' व 'गो' या इंग्रजी शब्दांसह इंग्रजी अंकांचा वापर केला जात होता. मात्र, आता त्यामध्ये बदल करण्यात आला आहे.

रविवारी (ता. १४) बदलापूर पूर्वेकडील घोरपडे चौक परिसरात नगराध्यक्ष रुचिता घोरपडे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष विकास गुप्ते, तालुकाध्यक्ष सुदाम कराळे, शहराध्यक्ष मांडवीकर, माजी शहराध्यक्ष जयेश कदम तसेच माजी उपनगराध्यक्ष प्रकाश पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मराठी भाषा, संस्कृती आणि अस्मितेचा गौरव जपण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे नागरिकांना दैनंदिन जीवनात वाहन चालविताना तसेच रस्त्यांवर वावरताना मराठी अंक आणि शब्दांचा अधिक प्रमाणात अनुभव घेता येणार आहे. बदलापूर शहरात मराठी भाषेला प्राधान्य देण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

नगराध्यक्षांचा मराठी बाणा

महाराष्ट्रात केवळ मराठी माणसांनीच मराठी बोलावी असे नाही, तर इतर राज्यांतून नोकरी किंवा व्यवसायानिमित्त महाराष्ट्रात वास्तव्यास आलेल्या नागरिकांनाही किमान व्यावहारिक पातळीवर मराठी भाषा अवगत असणे आवश्यक असल्याचे मत नगराध्यक्ष रुचिता घोरपडे यांनी व्यक्त केले. बदलापूरमध्ये उत्तर भारतीय तसेच मल्याळी समाजातील नागरिकांनी मराठी भाषा शिकण्यासाठी प्रशिक्षण सुरू केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

'टनल हूड' तंत्रज्ञानाचा प्रथमच वापर; बुलेट ट्रेन प्रकल्पामधील पर्वतीय बोगद्यांसाठी उपयुक्त

Mumbai : सागरी सुरक्षेला बळ; सागर रक्षक दलाच्या स्वयंसेवकांची संख्या पोहोचली ३ हजार १५६ वर

Mumbai : सलीम डोला पोलिसांची दिशाभूल करत असल्याचा संशय

Mumbai : नाल्यातील गाळ नाल्यातच! मनसेने फोटो दाखवत केली पोलखोल

Mumbai : कोस्टल रोड अडीच वर्षांत पूर्ण होणार; मुख्यमंत्र्यांकडून पाहणी