ठाणे

भिवंडी मेट्रो अपघात: हेल्मेट घालून तरुणांचा निषेध

ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो-५ प्रकल्पाच्या कामाच्या ठिकाणी झालेल्या अपघाताचा भिवंडीतील तरुणांनी अनोख्या पद्धतीने निषेध केला आहे.

Swapnil S

भिवंडी : ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो-५ प्रकल्पाच्या कामाच्या ठिकाणी झालेल्या अपघाताचा भिवंडीतील तरुणांनी अनोख्या पद्धतीने निषेध केला आहे. बुधवारी सकाळी धामणकर नाका ते नारपोली परिसरात रिक्षाचालक आणि प्रवाशांनी डोक्यात हेल्मेट घालून एमएमआरडीए प्रशासनाविरोधात आपला संताप व्यक्त केला. या अभिनव निषेधाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

मंगळवारी रिक्षातून प्रवास करणाऱ्या रमजान अली (२२) या तरुणाच्या डोक्यात बांधकामाच्या ठिकाणाहून एक लोखंडी सळई घुसली.

या अपघातानंतर मेट्रो कामाच्या ठिकाणी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एमएमआरडीए प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप करत संतप्त स्थानिक तरुणांनी बुधवारी सकाळी रस्त्यावर उतरून हा अनोखा निषेध नोंदवला. रिक्षातून प्रवास करताना हेल्मेट घालून, त्यांनी प्रशासनाला एकप्रकारे आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला. मेट्रोच्या कामामुळे आता रस्त्यावरून चालणे किंवा प्रवास करणेही सुरक्षित राहिलेले नाही, त्यामुळे स्वतःच्या सुरक्षेसाठी हेल्मेट घालण्याशिवाय पर्याय नाही,असा संदेश या आंदोलनातून देण्यात आला.

तरुणाची प्रकृती स्थिर; अज्ञातावर गुन्हा दाखल

भिवंडी : भिवंडीत मेट्रो प्रकल्पाच्या कामाच्या ठिकाणाहून कोसळलेली लोखंडी सळई डोक्यात घुसून गंभीर जखमी झालेल्या रमजान अली शेख (२२) या तरुणावर तब्बल पाच तास चाललेली शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे,या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती सध्या स्थिर असून त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. या धक्कादायक घटनेप्रकरणी प्रत्यक्षदर्शी मित्र अख्तर मूर्तजा अन्सारी (५५) याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञातावर भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पंचनामा करून जबाबदार कर्मचारी, अधिकारी किंवा ठेकेदारावर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदीप कांबळे यांनी दिली आहे. विरोधी पक्षांनी मात्र थेट कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली आहे.

तरुण तेजपालला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; याचिका फेटाळली, दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

Mumbai : माझगावच्या गणपती मिरवणुकीवर अंडी फेकल्याचा आरोप; २२ वर्षीय तरुणाला अटक

Mumbai : बीकेसीतील 'एमसीए'च्या ५ उपाहारगृहांचे परवाने रद्द; FDA चा दणका; कारवाई सुरूच

Mumbai : चर्चगेट मेट्रो स्थानकातील लिफ्ट अचानक बंद; ६ प्रवासी अडकले

गर्लफ्रेंडने कारवर उमटवले ३४०० 'किस'; VIDEO व्हायरल होताच पोलिसांची कारवाई, तरुणाला ५,५०० रुपयांचा दंड