भिवंडीत ६ हजार लिटर मिथेनॉल जप्त (Photo-X)
ठाणे

भिवंडीत ६ हजार लिटर मिथेनॉल जप्त

पुणे येथील विषारी दारू पिण्याने २२ जणांचा दुर्दैवी बळी गेल्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या सरकारी यंत्रणांनी धाडी टाकण्यास सुरुवात केली आहे.

Swapnil S

भिवंडी : पुणे येथील विषारी दारू पिण्याने २२ जणांचा दुर्दैवी बळी गेल्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या सरकारी यंत्रणांनी धाडी टाकण्यास सुरुवात केली आहे. अन्न व औषध प्रशासनाने भिवंडी तालुक्यातील वळ ग्रामपंचायत हद्दीतील म्हात्रे कंपाऊंड येथील मेसर्स रेक्स इंटरनॅशनल कंपनीच्या गोदामावर शुक्रवारी रात्री छापा टाकून गोदामातील प्लास्टिक ड्रममध्ये साठवलेला ५९२९ लिटर मिथेनॉलचा साठा जप्त केला.

या मिथेनॉलचा वापर पुणे येथे विषारी दारू बनवण्यासाठी केला गेला होता. भिवंडी परिसरातील गोदामात मोठ्या प्रमाणावर रासायनिक पदार्थांचा साठा अनधिकृतपणे केला जातो. एक महिन्यापूर्वी राहनाळ ग्रामपंचायत हद्दीत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने गोदामावर केलेल्या छापामारी कारवाईत ३४९ किलो उच्च प्रतीचे कोकेन जप्त केले होते. तिची किंमत १७४५ कोटी रुपये होती.

विशेष म्हणजे मागील कारवाई प्रमाणेच अन्न व औषध विभागाच्या कारवाईची माहिती स्थानिक नारपोली पोलीस ठाण्याला नव्हती. भिवंडी गोदाम परिसरात मोठ्या कारवाया होत असताना त्याची माहिती स्थानिक पोलिस यंत्रणेला कशी लागत नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सामान्य माणसाच्या कल्याणासाठी काम करा; अर्थमंत्री सीतारामन यांचे प्राप्तिकर विभागाला निर्देश

Nashik : भरधाव ट्रक फ्लायओव्हरवरून थेट ५० फूट खाली कोसळला; सिन्नरमधील भीषण अपघाताचा VIDEO व्हायरल

महाराष्ट्रात ८७.७९ टक्के मतदार अर्जांचे वाटप पूर्ण; १ लाखाहून अधिक BLO कडून मतदार याद्यांचे पुनरीक्षण

Mumbai : तीन वर्षांची असताना गिळलं टोपण; टीबी-दमा समजून डॉक्टरांनी ७ वर्षे केले चुकीचे उपचार, अखेर मुलीच्या फुफ्फुसाचा भाग काढला

Mumbai : पोलिसांची गाडी रोखणाऱ्या 'त्या' तरुणीची सायबर सेलमध्ये धाव; ऑनलाइन छळ, अश्लील ट्रोलिंगविरोधात तक्रार