ठाणे

भिवंडीत भाजप नेत्यासह चुलत भावाची हत्या; १२ जणांवर गुन्हा दाखल

भाजपच्या युवा नेत्यासह त्याच्या चुलत भावाची कार्यालयाबाहेरच निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडीत तालुक्यातील खारबाव चिंचोटी रस्त्यावरील खार्डी गावातील कार्यालयाबाहेर घडली आहे. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात १२ हल्लेखोरांविरोधात दुहेरी हत्याकांडाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Swapnil S

भिवंडी : भाजपच्या युवा नेत्यासह त्याच्या चुलत भावाची कार्यालयाबाहेरच निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडीत तालुक्यातील खारबाव चिंचोटी रस्त्यावरील खार्डी गावातील कार्यालयाबाहेर घडली आहे. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात १२ हल्लेखोरांविरोधात दुहेरी हत्याकांडाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रफुल्ल तांगडी, (४२ ) आणि तेजस तांगडी (२२) अशी हत्या झालेल्या युवकांची नावे असून मृतक प्रफुल्ल हे भाजप युवा मोर्चा ठाणे ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. तर विकी भरत म्हात्रे, कल्पेश रामदास वैती, अजय सुरेश तांगडी, महेंद्र नामदेव तांगडी, व्यानंद नामदेव तांगडी, सुनिल सुभाष भोईर, प्रसाद गजानन तांगडी, मोहन बाळकृष्ण तांगडी, नऊस नरेश नांदुरकर व विजय एकनाथ मुकादम, रवींद्र एकनाथ मुकादम, जितेश मधुसुदन गवळी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रफुल्लचे याच गावात मुख्य रस्त्यावर जे.डी. टी. इंटरप्रायझेस नावाचे व्यावसायिक कार्यालय आहे. याच कार्यालयातून प्रफुल्ल आणि तेजस हे दोघेही घरी जाण्यास निघाले असता धारधार शस्त्र हातात असलेल्या चार ते पाच हल्लेखोरांनी दोघांवर सपासप वार केले.

अयोध्येत २९ लाख दिव्यांची विक्रमी आरास! ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद

उपोषणकर्त्या शेतकऱ्याला घरी बोलावून पाजला ज्यूस; "किती ही सत्तेची मस्ती"...रोहित पवारांचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल

Mumbai : घर बदलणं महागात पडलं! 'मूव्हर्स अँड पॅकर्स'च्या कर्मचाऱ्यांनी ६.८ लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास; गुन्हा दाखल

Mumbai : १५ वर्षांनंतर MMRDA चा निर्णय; वडाळा ट्रक टर्मिनल प्लॉटचा १,६२९ कोटींना लिलाव होणार

'मविआ'चा एल्गार; EC विरोधात १ नोव्हेंबरला विराट मोर्चा; एक कोटी घुसखोर मतदार कमी करा! केंद्रीय गृहमंत्र्यांना विरोधकांचे आवाहन