भिवंडीतील 'त्या' अनियमिततेसाठी चौकशी पथक; मुद्रांक शुल्क चोरी, दस्तनोंदणीतील गैरव्यवहार तपासणार 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
ठाणे

भिवंडीतील 'त्या' अनियमिततेसाठी चौकशी पथक; मुद्रांक शुल्क चोरी, दस्तनोंदणीतील गैरव्यवहार तपासणार

भिवंडी ३ येथील संयुक्त दुय्यम निबंधक कार्यालयात जमीन व्यवहाराच्या दस्तनोंदणीमध्ये कथित अनियमितता झाल्याच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चौकशी पथक स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.

Swapnil S

मुंबई : भिवंडी ३ येथील संयुक्त दुय्यम निबंधक कार्यालयात जमीन व्यवहाराच्या दस्तनोंदणीमध्ये कथित अनियमितता झाल्याच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चौकशी पथक स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शाळेतील मित्र असगर अली व्होरा यांच्यावतीने करण्यात आलेल्या तक्रारीनंतर हे आदेश देण्यात आले. व्होरा यांचा मीरा-भाईंदरमधील आमदार नरेंद्र मेहतांशी जमीन व्यवहारावरून वाद सुरू आहे.

जिल्हा उपनिबंधक वरुणकुमार सहारे यांच्या नेतृत्वाखाली चार सदस्यीय पथक स्थापन करण्यात आले आहे. या पथकात संयुक्त दुय्यम निबंधक संजय सुकनवाड, दुय्यम निबंधक सुशील लोकारे आणि वरिष्ठ लिपिक सुनील परित यांचा समावेश आहे. आदेशाची अंमलबजावणी एका आठवड्यात करून पुढील १५ दिवसांत चौकशी अहवाल नोंदणी महानिरीक्षकांकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

काय आहे पार्श्वभूमी

८१ वर्षीय व्होरा हे सर्वसाधारणपणे प्रसिद्धीपासून दूर राहणारे व्यक्ती आहेत. मात्र, ८ सप्टेंबर रोजी मुंबईत पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील नवघर येथील त्यांच्या भूखंडावर बळकावण्याचे प्रयत्न होत असल्याची चौकशी करण्याची मागणी केल्यानंतर ते चर्चेत आले. त्यानंतर मेहता यांनी भूखंडावरील दावा मागे घेणार असल्याचे जाहीर केले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : १६ हजार बॅनर्सवर कारवाई; दीड महिन्यांत मात्र केवळ १७ जणांवर गुन्हे दाखल

Mumbai : विद्यार्थ्यांना पालिकेच्या फक्त २० जागा मिळणार; नर्सिंग कॉलेजच्या खासगीकरणाला विरोध

महाविकास आघाडीत शरद पवार गट लक्ष्य; ठाकरे गट आणि काँग्रेसची जोरदार टीका

Mumbai : वांद्रे टर्मिनसवर ७५ दिवसांचा ब्लॉक

जळगाव जिल्हा बँकेसाठी आज मतदान'; ९ जागांसाठी २९ उमेदवार; सोमवारी मतमोजणी