दहशतवाद्यांच्या रडारवर भिवंडीतील नारपोली पोलीस ठाणे? 
ठाणे

दहशतवाद्यांच्या रडारवर भिवंडीतील नारपोली पोलीस ठाणे?

उत्तर प्रदेश एटीएसच्या तपासादरम्यान भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. अटक करण्यात आलेल्या संशयितांकडून झालेल्या चौकशीत नारपोली पोलीस ठाण्याची रेकी करण्यात आल्याचा आणि त्यास लक्ष्य करण्याचा कट रचला जात असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.

Swapnil S

भिवंडी : उत्तर प्रदेश एटीएसच्या तपासादरम्यान भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. अटक करण्यात आलेल्या संशयितांकडून झालेल्या चौकशीत नारपोली पोलीस ठाण्याची रेकी करण्यात आल्याचा आणि त्यास लक्ष्य करण्याचा कट रचला जात असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.

तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, वांद्रे येथील गरीबनगर परिसरातील अनधिकृत मशिदीवरील कारवाईचा बदला घेण्याच्या उद्देशाने पोलिसांवर हल्ल्याचा कट रचण्यात आल्याची शक्यता तपासली जात आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दानियाल अशरफ याने नारपोली पोलीस ठाण्याचे छायाचित्रे तसेच जवळील मेट्रो पुलाचा सुमारे १८ सेकंदांचा व्हिडीओ तयार करून पाकिस्तानस्थित हँडलर्सना पाठविल्याचा आरोप आहे. तपासात आरोपींना पोलीस ठाणी आणि सुरक्षा व्यवस्थेशी संबंधित संवेदनशील माहिती गोळा करण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही समोर आले आहे.

तपास यंत्रणांच्या प्राथमिक माहितीनुसार, या नेटवर्कचे कथित संबंध ‘तहरिक-ए-तालिबान हिंदुस्तान’ या संघटनेशी तसेच शहजाद भट्टी याच्याशी असावेत, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याशिवाय, या प्रकरणात पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयची संभाव्य भूमिका आहे का, याचाही तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना पैशांचे आमिष दाखवून संवेदनशील ठिकाणांची रेकी करण्यासाठी वापरले जात असल्याचेही तपासातून समोर आले आहे.

शिवाजी पार्कवर विनापरवानगी आंदोलन; ५०० जणांवर गुन्हे, दीपकेंसह आयोजकांचा समावेश

'मविआ'त नाराजीनाट्य; काँग्रेसने विधान परिषद उमेदवारी जाहीर केल्याने आघाडीत बिघाडी; नेत्यांमध्ये आज पुन्हा चर्चा

जंतरमंतरवर १५० आंदोलक ताब्यात; नेहा बोरा, योगेंद्र यादव, प्रशांत भूषण यांचा समावेश

तीन वर्षांतच खटल्यांचा निकाल; गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा; BNS ची पूर्ण अंमलबजावणी गरजेची

Asian Games 2026 : सुवर्ण वर्षाव सुरूच; आशियाई स्पर्धेत भारताची दमदार कामगिरी