ठाणे

Dombivli Civic Elections 2026 : डोंबिवलीत भाजपकडून पैशांची पाकिटे वाटल्याचा आरोप

राज्यात जास्तीत जास्त ‘बिनविरोध’ नगरसेवक निवडून आणण्याऱ्या डोंबिवलीत निवडणुकीपूर्वी भाजपकडून पैशांची पाकिटे वाटली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Swapnil S

डोंबिवली : राज्यात जास्तीत जास्त ‘बिनविरोध’ नगरसेवक निवडून आणण्याऱ्या डोंबिवलीत निवडणुकीपूर्वी भाजपकडून पैशांची पाकिटे वाटली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

डोंबिवलीच्या तुकाराम नगर परिसरातील दशरथ भुवन भागात भाजपकडून नागरिकांच्या घरी तीन हजार रुपयांची पाकिटे वाटली जात असल्याची चर्चा आहे.

शिवसेनेचे उमेदवार नितीन पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटणाऱ्या व्यक्तींना ‘रंगेहाथ’ पकडल्याचा दावा केला आहे. नागरिकांना पैसे वाटप होत असल्याची माहिती मिळताच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी संबंधित ठिकाणी धाव घेतली आणि प्रकार उघडकीस आणला.

या घटनेनंतर निवडणूक आयोगाचे पथक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू असून, पैशांचे वाटप नेमके कोणी आणि कुणाच्या सांगण्यावरून केले, याचा तपास केला जात आहे. निवडणूक आचारसंहितेच्या उल्लंघनाचा गंभीर आरोप भाजपवर होत आहे.

ई-चलनच्या दंडाविरोधात न्यायालयीन लढाई; सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी

Mumbai : एफडीएने ४३ परवाने केले निलंबित; १७.८ टन साठा केला जप्त, दिवाळीत FDA ची मोठी कारवाई

पेण अर्बनच्या खातेदारांना दिवाळी भेट; खातेदारांना ठेवींच्या १० टक्के रक्कम मिळणार, उच्च न्यायालयाचा निकाल

अक्कलकोटला दर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; आजी-आजोबा आणि ८ वर्षांच्या नातवाचा मृत्यू, आई-वडील गंभीर

सक्तीची सेवानिवृत्ती शिक्षा नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा