ठाणे

ठाणे महापालिकेच्या कामामुळे बेस्टची ७०० नंबरची बस बंद

बेस्ट उपक्रमाने ठाणे पश्चिमेकडून बेस्ट बस सेवा सुरु करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

प्रतिनिधी

मुंबई : ठाणे महापालिकेच्या माध्यमातून पूर्वेला सॅटिस प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्यामुळे पूर्वेला जाणारी बेस्ट उपक्रमाची बस सी ७०० चार बस स्थानके आधीच बंद करण्यात आली आहे. त्यामुळे ही ७०० बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. बेस्ट उपक्रमाने ठाणे पश्चिमेकडून बेस्ट बस सेवा सुरु करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

ठाणे महापालिकेने ठाणे स्मार्ट सिटी अंतर्गत सॅटिस प्रकल्प पूर्व दिशेस हाती घेतला असून येथे उड्डाणपूल बांधण्यासाठी येथील आनंद नगर, स्वामी विवेकानंद चौक ते ठाणे स्टेशन( पूर्व) कोपरी दरम्यानकचा भास्कर पाटील मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. कोपरी येथे बेस्टची एकमेव बस सी ७०० ही मागाठाणे आगारहुन घोडबंदर मार्गाने ठाणे स्थानक पूर्व कोपरी येथे येते. या मार्गावर धावणाऱ्या या बसचे विद्यमान प्रवर्तन गुरुवारपासून अप आणि डाऊन दिशेत स्वामी विवेकानंद चौक (बारा बंगला) येथे बंद करण्यात आले आहे. यामुळे या बसचे सिद्धार्थ नगर ,गावदेवी मंदिर, ठाणे स्टेशन (पूर्व) हे बस थांबे वगळले गेले आहेत. या रस्त्याचे काम हे २४ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे बेस्ट बस प्रवाशांची प्रचंड गैरसोय होणार आहे.


ठाणे पूर्व कोपरी येथे ठाणे महापालिका सेवा, मीरा-भाईंदर परिवहन सेवा, वसई विरार परिवहन सेवा नवी मुंबई परिवहन सेवा व बेस्टची बस सेवा उपलब्ध आहे. आता या सर्व बस सेवा ठाणे स्थानक पश्चिम येथून सोडण्यात येणार आहेत. मात्र बेस्टची एकमेव बससेवा ही बारा बंगला येथे खंडित करण्यात आली आहे. बस क्रमांक सी ७०० ही बोरिवली हुन घोडबंदर येथे जाण्यासाठी व येण्यासाठी सोईस्कर पडते. तसेच बेस्टचे तिकीट भाडे ही इतर परिवहन सेवांच्या तुलनेत कमी असल्याने तसेच वक्तशीरपणामुळे प्रवाशांची जास्त पसंती बेस्ट बसला असते. आता ही बस बारा बंगला येथे खंडित केल्यामुळे प्रवाशांना मोठी पायपीट करावी लागणार आहे. त्यामुळे बेस्टची बस सेवा इतर बस सेवांसारखी ठाणे पश्चिमे स्थानकातून सोडण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

पराभवानंतर लालू प्रसाद यादव यांच्या मुलीचा धक्कादायक निर्णय; राजकारण आणि कुटुंब त्यागाची घोषणा

शिल्पकार राम सुतार यांना १०० व्या वर्षी 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४' प्रदान

श्रीनगर हादरले! फरिदाबादमधून जप्त केलेल्या स्फोटकांचा पोलिस स्टेशनमध्ये भीषण स्फोट, ९ जणांचा मृत्यू, दहशतवादी हल्ल्याचा संशय

नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ; मनी लाॅण्ड्रिंग प्रकरणात दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला

मालेगाव बाॅम्बस्फोटप्रकरणी आरोपींना नोटीस; सुनावणी दोन आठवडे तहकूब