ठाणे

शेतकऱ्यांना खोट्या पावत्या, १ कोटीचा भ्रष्टाचार! शहापुरातील भात खरेदी घोटाळ्याबाबत गुन्हा दाखल

शहापूर तालुक्यातील आदिवासी विकास महामंडळाची भात खरेदी दरवर्षी एक - ना - अनेक कारणांनी गाजत असते.

Swapnil S

शहापूर : शहापूर तालुक्यातील आदिवासी विकास महामंडळाची भात खरेदी दरवर्षी एक - ना - अनेक कारणांनी गाजत असते. या महामंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या आधारभूत भात खरेदी योजनेत मौजे -चारिव केंद्रामध्ये सुमारे १ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याने महामंडळातर्फे चारीव केंद्रचालक हेमंत शिंदे यांच्यावर किन्हवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा गुन्हा आदिवासी विकास महामंडळाच्या भात खरेदी आणि बारदान बाबतची तफावत असल्यामुळे व शेतकऱ्यांना भात खरेदीबाबत खोट्या पावत्या दिल्यामुळे दाखल करण्यात आला आहे.

आदिवासी विकास महामंडळातर्फे शहापूर तालुक्यात आधारभूत खरेदी योजनेनुसार भात शेतकऱ्यांकडून खरेदी केली जाते. यंदा शहापूर तालुक्यात भात खरेदी केंद्रात हजारो क्विंटल भाताची खरेदी केलेल्या १३ हजार ४४१ क्विंटल भातामध्ये २ हजार ९९५ क्विंटल भाताच्या मालामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आली असून ७५९९ बारदाणाचीही तफावत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे या प्रकरणात ९८ लाख ७ हजार रुपयांच्या भाताचा घोटाळा झाल्याचे दिसून येत आहे.

बनावट पावत्या बनवून शेतकऱ्यांची व आदिवासी विकास महामंडळाची फसवणूक करून सुमारे १ कोटी भात मालाची तफावत आल्यामुळे आदिवासी विकास महामंडळाचे शहापूर उपव्यवस्थापक सागर सोनवणे यांनी २५ मे रोजी शहापूर तालुक्यातील किन्हवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. याबाबतचा अधिक तपास सुरू आहे.

शहापूर तालुक्यात अजूनही भात खरेदी केंद्रांची उचल चालू आहे. लवकरच याबाबत भ्रष्टाचार उघड होण्याची शक्यता आहे. केंद्र चालविणारे जे सोसायटीचे चेअरमन व सचिव यांची उच्च पातळीवरून चौकशी होण्याची शेतकरी मागणी करत आहेत.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस