ठाणे

ठाणे स्थानकात मध्य रेल्वेची फुकट्या प्रवाशांवर कारवाई, १७३१ प्रवाशांकडून ६ लाखांचा दंड वसूल

विनातिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांवर मध्य रेल्वेने कारवाई केली असून मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकातून १७३१ फुकट्या प्रवाशांकडून ६ लाखांचा दंड वसूल केला आहे.

Swapnil S

ठाणे : विनातिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांवर मध्य रेल्वेने कारवाई केली असून मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकातून १७३१ फुकट्या प्रवाशांकडून ६ लाखांचा दंड वसूल केला आहे. या कारवाईसाठी रेल्वे प्रशासनाकडून विशेष मोहीम राबवण्यात आली होती. शुक्रवारी सकाळी ७ ते दुपारी ३ या एका दिवसांत ही मोहीम राबवण्यात आली असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. यावेळी ६९ रेल्वे कर्मचाऱ्यांसह १७ रेल्वे सुरक्षा कर्मचाऱ्यांचा फौजफाटा ठाणे स्थानकावर तैनात होता.

मध्य रेल्वेचे महत्त्वाचे आणि वर्दळीचे स्थानक अशी ओळख असलेल्या ठाणे रेल्वे स्थानकात लांबपल्ल्याच्या गाड्यांसह मेल, एक्स्प्रेस व सर्वच धीम्या व जलद लोकल थांबतात. तसेच कर्जत, कसारा, मुंबई, नवी मुंबई, पनवेलकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही मोठी आहे. दररोज ५ ते ६ लाख प्रवासी या स्थानकातून प्रवास करत असतात. त्यामुळे गर्दीचा फायदा घेऊन अनेक प्रवासी विनातिकीट प्रवास करतात. याचबरोबर जनरल डब्याचे तिकीट असताना फर्स्ट क्लासने प्रवास करणे, साध्या लोकलचे तिकीट असताना एसी लोकलने प्रवास करणे, अपंगांच्या डब्यातून प्रवास करणे असे प्रकार वाढले असून यामुळे नियमित तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे रेल्वे प्रवासी संघटनांच्या व सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रवाशांनी अशा प्रवाशांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

तिकीट तपासणी मोहीम पार

फुकट्या प्रवाशांना लगाम घालण्यासाठी मध्य रेल्वेने विशेष तिकीट तपासणी मोहीम सुरू केली असून, शुक्रवारी सकाळी ७ ते दुपारी ३ या कालावधीत प्लॅटफॉर्मसह, रेल्वे स्थानकांचे एक्झिट गेट येथे प्रवाशांची तिकीट तपासणी करण्यात आली. या तपासणी दरम्यान १ हजार ७३१ प्रवासी विनातिकीट प्रवास करत असल्याचे रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आले. या प्रवाशांकडून ६ लाख २ हजार ६५५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ६९ तिकीट तपासनीस व रेल्वे कर्मचाऱ्यांसह १७ रेल्वे सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ही तिकीट तपासणी मोहीम पार पाडली.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी