ठाणे

सुरक्षा रक्षकाच्या मृत्यूची सीआयडी चौकशी करणार

अभिताश सिंह

ठाणे रेल्वे पोलिसांच्या कोठडीत ५९ वर्षीय सुरक्षा रक्षक राजेश भावसार यांचा ६ ऑक्टोबर रोजी मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची सीआयडीतर्फे चौकशी करण्यात येईल, असे ठाणे रेल्वे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

महिन्याभरापूर्वी राजेश भावसार हे २५ वर्षीय तरुणीचा पाठलाग करत होते. या गुरुवारी त्या मुलीच्या आईने ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात भावसार यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भावसार याला ताब्यात घेतले. पोलिसांनी चौकशी करण्यापूर्वीच भावसार याचा तेथे ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे म्हणाले की, या प्रकरणाची चौकशी सीआयडीकडून करण्यात येणार आहे. कल्याणला राहणारी २५ वर्षीय तरुणी पनवेलला कामाला होती. ती रोज कल्याण ते ठाणे मार्गाने प्रवास करत होती. तर भावसार हा बेलापूरच्या एटीएम केंद्रावर सुरक्षा रक्षकाचे काम करतो. गुरुवारी सकाळी त्याने या तरुणीचा पाठलाग केला. त्यावेळी या पीडितेची आई तिच्यासोबत होती. त्यावेळी हा भावसार तिच्या पाठोपाठ येत होता. ही घटना आरपीएफ पाहत होते. त्यांनी भावसारला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर भावसार चक्कर येऊन पडला. त्याला तात्काळ ठाणे जिल्हा रुग्णालयात दाकल केले. तेथे उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले. याबाबत ठाणे रेल्वे पोलिसांना कळवण्यात आले.

रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद म्हणाले की, पोलीस ठाण्यात आणल्यानंतर राजेश भावसारचा मृत्यू झाला. त्याचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. मानवी हक्क आयोगाच्या नियमानुसार, कोठडीतील मृत्यूची सीआयडीमार्फत चौकशी केली जाते. सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची चौकशी केली. तसेच सीटीटीव्ही फुटेजही तपासले आहेत.

विनातिकिट प्रवास हा गुन्हाच- हायकोर्ट; उच्चपदस्थ अधिकाऱ्याला तूर्तास दिलासा

आज पनवेल, कल्याण, अंबरनाथ तापणार; ४४ अंश तापमानाचा अंदाज

५ लाख पर्यटकांचा प्रवास; ऐतिहासिक नेरळ-माथेरान टॉय ट्रेनला पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; मिळाला तब्बल 'इतक्या' कोटींचा महसूल

खासगीकरणाची 'बेस्ट' धाव ! बेस्टमध्ये आता ड्राफ्ट्समनही कंत्राटी; अंतर्गत कामासाठी कंत्राटी पद्धत

वर्षा गायकवाड VS उज्ज्वल निकम ; उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघात चुरस वाढली