ठाणे

कोचिंग क्लासेस संघटना पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या रिंगणात

Swapnil S

ठाणे : कोकण पदवीधर मतदारसंघातील यंदाची निवडणूक कोचिंग क्लासेस संघटनेच्या प्रवेशामुळे रंगतदार झाली आहे. कोचिंग क्लासेस संघटनेचे सुमारे साडेसात हजार पदवीधर सदस्य या निवडणुकीत सक्रीय झाल्याने ही निवडणूक चुरशीची होणार आहे. दरम्यान, शिवराज्याभिषेक दिनाचा मुहूर्त साधून गुरुवारी कोचिंग क्लासेसचे अमोल जगताप यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

ठाण्यात कोकण पदवीधर निवडणूकिसाठी कोचिंग क्लास संघटनेच्यावतीने अमोल जगताप यांना उमेदवारी देण्यात आली असून शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या आणि रोजगार निर्मिती करणे, यासारखे विविध प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून अमोल जगताप यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आपला अर्ज दाखल करण्याआधी जगताप यांनी कोर्टनाका येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी सतीश देशमुख, उपाध्यक्ष प्रकाश पाटील, शैलेश सपकाळ भरत जाधव बबन चव्हाण संचालक शिक्षक उपस्थित होते. सदर प्रसंगी त्यांनी, शिक्षक, पदवीधरांचे प्रश्न, बेरोजगारी याबाबत विधीमंडळात आवाज उठवण्यासाठी आपण निवडणूक लढवित असल्याचे सांगितले.

दरम्यान, गेल्या सहा महिन्यांपूर्वी कोचिंग क्लासेस संचालक संघटनेच्या वतीने ९००० तरुण पदवीधर यांचे अर्ज भरून त्यांचा समावेश मतदार म्हणून करून घेतला आहे. शिवाय, हजारो माजी विद्यार्थी यांना संपर्क साधण्यात आलेला आहे.

महाराष्ट्रातील क्लासेस संचालक म्हणजेच खासगी शिक्षक यांच्या न्याय हक्कासाठी संघटना काम करीत आहे. शालेय शिक्षण व्यवस्था कमकुवत पडत आहे. मात्र, त्यांच्या रोजगाराबाबत कोणीही बोलत नाही. पदवीधर याच्या समस्यांबाबतही कोणताही विचार केला जात नाही. पदवीधरांना केवळ गृहीत धरण्यात येते. त्याविरोधात आमचा लढा आहे. - सतीश देशमुख, अध्यक्ष कोचिंग क्लासेस संघटना

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त