ठाणे

१५ लाखांची लाच घेताना हवालदाराला रंगेहाथ अटक; लाचलुचपत विभागाच्या एकाच दिवशी दोन धाडी

लाच घेण्याची इच्छा नसतानाही लाच देणाऱ्या गुटखा पानमसाला विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आले.

Swapnil S

भाईंदर : मीरारोडमध्ये एका व्यक्तीला व त्याच्या सोबतच्या व्यक्तीला गुन्ह्यात जामीन मिळवून देणे तसेच अटक न करण्यासाठी फिर्यादी यांच्याकडून सुरुवातीला ५० लाख रुपये मागितले. त्यानंतर तडजोडीअंती ३५ लाख रक्कम ठरवून १५ लाखांचा पहिला हप्ता घेताना पोलीस हवालदार गणेश वणवे यांना अटक केली आहे, तर आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार हे फरार आहेत.

नया नगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा दाखल गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार हे तपास करत होते. त्यांच्या संपर्कात भाईंदर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार गणेश वणवे हे होते. वणवे यांच्या तक्रारदार हे ओळखीचे होते. त्याच गुन्ह्यात शेलार यांनी तक्रारदार व त्यांचे सोबती यांना जामीन मिळवून देणे, अटक न करणे अशा प्रकारची मदत करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे ५० लाखाची मागणी केली व तडजोडीअंती ३५ लाख रुपये स्वीकारण्याची तयारी दाखवून पहिला हप्ता १५ लाख रुपये घेण्याचे ठरले. त्यानुसार मिरारोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री १२ च्या दरम्यान पैसे घेताना रंगेहाथ पोलिसांनी अटक केली आहे.

अटक आरोपीने रात्री बुधवारी १५ लाख रुपये रक्कम पंचांसमक्ष स्वीकारली असता रंगेहात पकडण्यात आले असून त्याच्याविरुद्ध व पाहीजे आरोपी पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार यांच्या विरोधात मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सदरची कारवाई ही ठाणे परिक्षेत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील लोखंडे, अपर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर, अपर पोलीस अधीक्षक सुधाकर सुराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.

पोलिसांना लाच देणाऱ्या व्यक्तीस अटक

लाच घेण्याची इच्छा नसतानाही लाच देणाऱ्या गुटखा पानमसाला विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आले. सुरेंद्र चौरसिया असे या ४३ वर्षीय व्यक्तीचे नाव असून त्याला पाच हजारे देताना पकडण्यात आले. चौरसिया यांना परिसरात गुटखा पानमसाला विक्री करायची असल्याने त्याच्यावर कारवाई न करण्यासाठी तो लाच देत असल्याचे समजते.

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

शाडू मातीच्या मूर्ती आता होणार ‘ऑनलाइन’ उपलब्ध; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी BMC चे विशेष प्रयत्न

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी; परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश